ईटकूर – आमदाराच्या कार्यकाळात परिसरात कोणताही ठोस विकास झालेला नाही.नागरिकांच्या मुलभूत गरजा,रस्ते,पाणीपुरवठा, स्वच्छता इत्यादी प्रश्न आजही तसेच आहेत,मात्र या आमदाराने या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. फक्त गोड बोलण्यात अग्रेसर असणाऱ्या आमदाराला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील जनतेने त्याची जागा दाखवून द्यावे असे आवाहन कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्राचारार्थ दि.१३ नोव्हेंबर २०२४ वार बुधवार रोजी कळंब तालुक्यातील ईटकूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांनी स्पष्टपणे सांगितले की,या आमदाराच्या निष्क्रियतेमुळे परिसरातील जनता त्रस्त आहे.नागरीकांच्या अपेक्षेप्रमाणे कूठल्याही भागाची विकासकामे झाली नसल्याचे पिंगळे यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी पुढे आवाहन केले की,स्थानिक नागरिकांनी आता जागृत होऊन आपल्या हक्कांसाठी एक नंबर क्रमांकावर माझे चिन्ह धनुष्य बाणावर भरघोस मते देवून विजयी करावे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुशील शेळके,पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण आडसूळ यांनी अजित पिंगळे यांना उद्याच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन केले. तसेच यावेळी गंभीरवाडी,वाकडी (केज),आंदोरा या गावातील बैठकीला मतदारांची मोठी गर्दी होती.यावेळी वाकडी (केज) या गावातील अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी गावातील बहुसंख्य मतदारांची,महायुती व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात