कळंब (माधवसिंग राजपूत ) – कळंब येथे श्री सद्गुरु निरंजन रघुनाथ स्वामी पादुका मंदिराचे निर्माण करण्यात आले असून मंदिरात पादुका प्राणप्रतिष्ठा सोहळा होम, हवन,मंत्र उच्चारात व उत्साहात दिनांक ९ नोव्हेंबर २०२४ कार्तिक शुद्ध ८ शके १९४६ शनिवार रोजी होम हवन व मंत्रोच्चारात संपन्न झाला. याप्रसंगी शंकर महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला.श्री सद्गुरू निरंजन रघुनाथ स्वामी महाराज यांचे कळंब हे गांव व जन्मस्थान आहे ते कळंब येथील श्रोत्रे – कुलकर्णी परिवारातील होते त्यांनी नाशिक तसेच गिरणार पर्वत येथे तपश्चर्या केली त्यांना श्री गुरु दत्तप्रसन्न झाले व त्यांनी ग्रंथ लेखन केले यामध्ये अमृत अनुभव तसेच कंठोपोनिषद टीकात्मक ग्रंथ याचा समावेश आहे. कळंब येथे सदभक्त यशवंत दशरथ यांच्या पुढाकाराने पादुका मंदिर निर्माण कार्य पूर्णत्वास गेले आहे.यानिमित्त दि. ७ नोव्हेंबर पादुका शोभायात्रा दि. ८ नोव्हेंबर दत्तयाग व .दि ९ नोव्हेंबर पादुका प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अतिथी परमपुज्य योगश्री शरद शास्त्री जोशी महाराज (वासुदेव निवास पुणे),किर्तनकार श्री. चैतन्य सहस्त्रबुध्दे यवतमाळ ( महाराजांचे चरित्र लेखक ),बंडोपंतजी दशरथ (कळंब व सद्गुरु रघुनाथ निरंजन स्वामी यांच्या विषयी पीएचडी करीत असलेल्या बीड येथील प्रा.पुष्पा जाधव व सुहास झोडगे तसेच सद्गुरु निरंजन रघुनाथ स्वामी यांच्या परिवारातील विजय श्रोत्रे, व श्रोत्रे- कुलकर्णी परिवारातील सदस्यांचे स्वागत व सत्कार कार्यक्रमाचे संयोजक यशवंत दशरथ ,जगदीश गोरे, अनिल कुलकर्णी, विलास खांडेकर ,सुनील देशमुख यांनी केले. याप्रसंगी योगश्री शरद शास्त्री जोशी महाराज यांनी आपल्या प्रवचन उपदेशात आई ,वडिलांपेक्षा मोठे दैवत नाही त्यांचे सेवा करा त्यांच्या आशीर्वादाने आयुष्य बल व विद्या प्राप्त होते आज आशीर्वादाचा बाजार झाला आहे सद्गुरु निरंजन रघुनाथ स्वामी यांच्या जन्मगावी , पादुका मंदिर निर्माण करण्याचे महान कार्य झाले आहे याबद्दल आनंद व्यक्त केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदभक्त यशवंत दशरथ ,अनिल कुलकर्णी, जगदीश गोरे ,विलास खांडेकर सुनील देशमुख ,अशोक पोरे , सेवा निवृत्त ब्रिगेडियर सुमंत दशरथ, श्रीकांत कुलकर्णी, श्रीराम कुलकर्णी, अवधूत कुलकर्णी ,दर्शन पोरे, माधवसिंग राजपूत, नाना वाघमारे, शिवाजी पचमिरे, बालाजी वाघमारे ,शंकर ताटे, यांनी परिश्रम घेतले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात