धाराशिव (जिमाका) – अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजना महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईनरित्या राबविल्या जात आहे.सन २०१८-१९ ते २०२३-२४ पर्यंत महाडीबीटी प्रणालीवर ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज Auto Reject व तांत्रिक अडचणीमुळे अर्ज नामंजुर झाले आहेत तसेच एखाद्या विद्यार्थ्याच्या नियमित परिक्षा अथवा पुरवणी परिक्षेचा निकाल विहीत वेळेत न लागल्याने अर्ज भरता आला नाही, अथवा अर्ज भरूनही पुढील वर्षाचा अर्ज नुतनीकरण करण्यास अडचण आली अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ऑफलाईन पद्धतीने मंजूर करून अदा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सन २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीतील ज्या विद्यार्थ्यांना वरील नमूद कारणामुळे महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरता आले नाहीत किंवा अर्ज भरल्यास तांत्रिक अडचणीमुळे शिष्यवृत्तीचा अर्ज नामंजूर झाला आहे,अशा विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबर २०२४ पूर्वी समाज कल्याण कार्यालयाकडे शासन निर्णयातील नमूद अटी व शर्तीनुसार महाविद्यालयामार्फत सादर करावे. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सन २०१८-१९ ते २०२३ -२४ या कालावधीतील महाविद्यालयातील वरील नमूद कारणामुळे शिष्यवृत्ती अर्ज भरू न शकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या स्तरावरून अवगत करावे. सन २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीतील विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर प्राप्त झालेले ऑफलाईन अर्ज ३० नोव्हेंबर २०२४ पूर्वी या कार्यालयाकडे सादर करावेत.३० नोव्हेंबर २०२४ नंतर येणाऱ्या कोणत्याही अर्जांना शासनाकडून मंजूरी देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी