August 8, 2025

भक्कम लोकशाही करिता संविधानाचा जागर घरोघरी व्हावा- संतोष राऊत

  • शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब येथे संविधान मंदिराचा उद्घाटन समारंभ संपन्न
  • कळंब- भक्कम लोकशाही करिता संविधानाचा जागर घरोघरी व्हावा असे प्रतिपादन कौशल्य विकास व नाविन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष राऊत यांनी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था कळंब येथील संविधान मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात केले.
    सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातुन प्राप्त होत असल्यामुळे कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षनार्थीना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी यासाठी ना. मंगल प्रभात लोढा,मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या संकल्पनेतून राज्यातील ४३४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे.

  • या संविधान मंदिराचे उद्घाटन उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या शुभ हस्ते दिनांक १५ सप्टेंम्बर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था कळंबचे प्राचार्य केशव पवार हे होते तर विशेष उपस्थिती म्हणून कौशल्य विकास व नाविन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष राऊत हे होते. प्रमूख पाहुणे म्हणून डी. एस.लांडगे.उपशिक्षणाधिकारी, आयमसी सदस्य जी.बी.करडे, पी.बी.झोरी,आर.एम.कापसे, श्रीकांत खारके,वैभवराज फाटक,श्रीमती आशा राऊत, सूरज भांडे, महादेव आडसुळ, सुभाष घोडके, सी.आर.घाडगे, बंडू ताटे,प्रकाश भडंगे,प्रा.अविनाश घोडके, नवनाथ भंडारे,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत, पत्रकार मंगेश यादव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिल्पनिदेशक अंकूश माळकर, वसंत टोपे यांनी केले.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्वांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
    या कार्यक्रमात प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके लिखित जागर संविधानाचा हे पथनाटिकेचे पुस्तक प्राचार्य केशव पवार यांना सप्रेम भेट दिले.
  • यावेळी प्रा.अविनाश घोडके,बंडू ताटे,सी.आर.घाडगे,सुभाष घोडके,प्रकाश भंडगे,दत्तात्रय लांडगे,श्रीमती आशा राऊत, माधवसिंग राजपूत आदीं मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.या संविधान महोत्सवात विविध स्पर्धेत प्राविण्य प्राप्त प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
    हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे प्राचार्य केशव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गटनिदेशक शामकांत डोंगे, शिल्पनिदेशक लक्ष्मण निर्मळ, सुजित दंडनाईक, मंचक जाधव, धैर्यशील मडके, नदीम शेख, एस एस कुट्वाड, अक्षय सुतार, कल्लेश भोसले, बालाजी पांचाळ, शिल्पनिदेशिका रंजना फुलारी, गोदावरी वडजकर, ज्योती शिंदे, कोमल मेंडके, वरीष्ठ लिपिक विलास सुरवसे, भांडारपाल बाजीराव राऊत, लिपिक महेश सौलाखे, राहुल माळकर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी पप्पू मडके, फरजाना शेख यांच्यासोबत सर्व प्रशिक्षणार्थी यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!