धाराशिव (जिमाका) – जिल्हयात होमगार्ड कार्यालयातंर्गत येणाऱ्या पथकातील पुरुष व महिला यांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी नवीन होमगार्डची सदस्य नोंदणीकरीता ऑनलाईन पध्दतीने 25 जुलै ते 16 ऑगस्टदरम्यान अर्ज मागविण्यात आले होते.त्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी आज 21 ऑगस्टपासून सुरु झाली आहे.
या कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीसाठी 22 ऑगस्टपासून ते 26 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात दररोज सकाळी 05:30 वाजता नोंदणी क्रमांकानुसार उमेदवारांना बोलविण्यात आले आहे.ही प्रक्रिया पोलीस मुख्यालय,धाराशिव येथे होणार आहे.उमेदवारांना सकाळी 05:30 ते 10:30 या कालावधीमध्ये मैदानात प्रवेश दिला जाणार आहे.
22 ते 26 ऑगस्टपर्यंत केवळ पुरुष उमेदवारांना बोलविण्यात आले आहे. यात 22 ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक 1 ते 1428 पर्यंतच्या 1323 अशा उमेदवारांना बोलविले आहे. 23 ऑगस्ट रोजी 1429 ते 2906,24 ऑगस्ट रोजी 2907 ते 4366,25 ऑगस्ट रोजी 4367 ते 5823 या क्रमांकाच्या उमेदवारांना बोलविण्यात आले आहे.तर 26 ऑगस्ट रोजी सर्व 540 महिला उमेदवार यांना बोलविण्यात आले आहे.
धाराशिव जिल्हयातील रहीवासी उमेदवारांकरीता ही भरती असुन इतर जिल्हयातील ऑनलाईन अर्ज केलेले सर्व उमेदवार या नोंदणीकरीता अपात्र ठरवण्यात येतील.त्यामुळे धाराशिव जिल्हा सोडुन इतर जिल्हयातील उमेदवारांनी नोंदणी कार्यक्रमाकरीता उपस्थित राहु नये,असे आवाहन धाराशिवचे अप्पर पोलिस अधिक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड गौहर हसन यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला