नायगाव (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – कळंब तालुक्यातील नायगाव येथील शेतकरी भागवत दादा शितोळे यांचे चिरंजीव सचिन व दत्ता शितोळे बंधूंनी दि.१६ ऑगस्ट २०२४ रोजी आपल्या स्वतःच्या घरावर कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा केलेला आहे. कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असणारे प्रेम यातून व्यक्त होत आहे. सचिन व दत्ता शितोळे यांनी आपल्या नवीन घराचे बांधकाम पूर्ण होतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल असणारे प्रेम स्वतःच्या घरावर अश्वारूढ पुतळा उभा करून व्यक्त केले आहे.आज घराची वास्तुशांती व छत्रपती महाराज साहेबांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण ह. भ.प दिनकर बाबा महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,सहकार महर्षी अरविंद गोरे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले