कळंब (मानसी यादव ) – उमरगा तालुक्यातील नारंगवाडी व उमरगा केंद्रातील जिल्हा परिषद अंतर्गत 33 शाळांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव, डॉ.मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षणाधिकारी (प्राथ.)अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली जम्बो पथकाने गुरुवारी जिल्हा परिषद शाळांची भौतिक सुविधा पाहणी व गुणवत्ता पडताळणी केली. शाळेमध्ये उपलब्ध असणाऱ्या भौतिक सुविधा व गुणवत्तेच्या संदर्भात अध्ययन स्तर निश्चिती, स्पर्धा परीक्षा नियोजन,अध्ययन अध्यापन साहित्य व शालेय अभिलेखे यांची पडताळणी करण्यात आली. जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक व भौतिक सुविधा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाने ही मोहीम हाती घेतलेली आहे. बालकांची अपेक्षित अध्ययन क्षमता,पायाभूत चाचणी यामध्ये ठरवण्यात आलेल्या अध्ययन स्तर,अध्यापनामध्ये शैक्षणिक साहित्याचा वापर,शाळांमध्ये गरजेच्या असणाऱ्या मूलभूत सुविधा आणि गुणवत्ता तसेच पटसंख्या वाढवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमासह आवश्यक शालेय अभिलेख यांचा आढावा यावेळी पथकाने घेतला. उत्कृष्ट गुणवत्ता राबवलेल्या शाळा यांना अभिनंदन व कमी गुणवत्ता असणाऱ्या शाळांना सुधारण्यासाठी सक्त ताकीद देण्यात येणार आहे
*जम्बो पथकात होता यांचा समावेश* जम्बो पथक प्रमुख म्हणून शिक्षणाधिकारी (प्राथ.) अशोक पाटील, व उपशिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहिरे, शिक्षण अधीक्षक उद्धव सांगळे, आठ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व 23 विस्तार अधिकारी यांचा समावेश होता.
*दोन शाळांना कारणे दाखवा नोटीस सदरील गुणवत्ता तपासणी पथकाद्वारे शालेय गुणवत्तेत उदासीन दिसून येणाऱ्या दोन शाळांचा समावेश असून, सदरील शाळांना कारणे दाखवा नोटीस पाठवली जाणार आहे. वेळेत योग्य खुलासा सादर न केल्यास कार्यवाही केली जाईल. — अशोक पाटील शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद धाराशिव
** आजच्या बदलत्या काळात व तंत्रज्ञानाच्या युगात जिल्हा परिषद मधील एकही विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत मागे राहणार नाही, निपुण भारत व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांचा योग्य पद्धतीने अंमलबजावणी होण्याकरिता अचानक शाळा भेटी देऊन पडताळणी करण्यात आली. सदरील शाळा भेटी गुणवत्ता वाढीस नक्कीच मदत करतील. — डॉ.मैनाक घोष मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव
More Stories
बसस्थानकाच्या बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक
उमरगा शहर व तालुक्यामध्ये वृक्ष लागवड
आरोग्य क्षेत्रात समाज विकास संस्थेचे कार्य उल्लेखनीय