August 9, 2025

माळकरंजा येथील शालेय मंत्रीमंडळ निवडणूक संपन्न

  • कळंब ( शिवराज पौळ ) – तालुक्यातील माळकरंजा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतीच शालेय मंत्रीमंडळ निवडणूक संपन्न झाली.पिरामल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या निवडणुकीत शाळेतील विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवायला यावी. यासाठी निवडणूक फॉर्म भरण्यापासून माघार घेणे,प्रत्यक्ष प्रचार करणे,आपला विकासाचा अजेंडा मांडणे,निवडणूक आचारसंहिता संहिता पालन, गुप्त मतदान,मतमोजणीची उत्सुकता ते प्रत्यक्षात निकाल जाहीर झाल्यानंतर होणारा आनंद या सर्व क्षणांचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.निवडणुकिनंतर विजयी झालेल्या अंजली लोमटे हिची शाळेचा मुख्यमंत्री तर विराज शिंदे याची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.
    शालेय मंत्रीमंडळात,तनुजा पुदंगे,वाचनालय
    प्रथमेश गोडसे,क्रिडा रोहित शितोळे विज्ञान आणि तंत्रज्ञान मच्छिंद्र मोरे,स्वच्छता समिक्षा निकम,आरोग्य
    किर्ती मोहिते/अर्पिता लोमटे, मध्यान्ह भोजन
    श्लोक घाडगे, सांस्कृतिक अमृता लोमटे,परीपाठ
    याप्रमाणे खातेवाटप जाहीर करण्यात आले.
    मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष भोजने,स.शि.हणुमंत घाडगे,समीना बागवान,भारती सुर्यवंशी पिरामल फाउंडेशन चे फेलोशिप गणेश सिंह व विवेक कुमार यांनी सहकार्य केले.
error: Content is protected !!