- कळंब – संत नामदेवांच्या अभंगाप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त श्री.छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित शारदा इंग्लिश स्कुलचे प्रमुख रणजित रमेश आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१७ जुलै २०२४ रोजी श्री.गुरू रामचंद्र बोधले महाराज संस्थान,डिकसळ येथे बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
या दिंडीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या बालदिंडीसाठी शाळेने पालकांच्या मदतीने सांप्रदायिक पोशाख,भगवी पताका,मृदंग,टाळ,वीणा आणि विठुरायाची पालखी अशी जोरदार तयारी केली होती.
शारदा इंग्लिश स्कुलचे प्रमुख मार्गदर्शक रणजित रमेश आडसकर यांना कार्यक्रमात बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेला सा.साक्षी पावनज्योतचा विशेषांक व प्रबुद्ध रंगभूमी बहूद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष द.घोडके लिखित सत्यघटनेवर आधारित असलेली “साक्षी” ही कादंबरी कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांच्या हस्ते देण्यात आले.
- प्रथम विठुरायाची पूजा करून पालखीचे प्रस्थान झाले. जागोजागी पालखीमध्ये महिला, लहान थोर मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी होत होती. विसाव्याच्या ठिकाणी आपले वय, देहभान विसरून विठ्ठलाचा नामघोष करत फुगडी खेळण्यांमध्ये सर्व विद्यार्थी रंगून गेले होते.
नंतर शेवटी बोधले मठातून
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची रॅली ही स्कुल बसमधून कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून जयघोषात मिरवणूक काढण्यात आली होती.
यावेळी शारदा इंग्लिश स्कुलचे प्राचार्य जिप्सन जोश,संस्थानचे अण्णासाहेब बोधले महाराज,व्यवस्थापन प्रमुख रत्नाकर नेहरकर,गणेश अकुशकर,दिपक पवार,अनिल सावंत,प्रा.राहुल भिसे,प्रथमेश गायकवाड,जाधव,सुरज रोडे,सा.साक्षी पावनज्योत कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके सह शारदा इंग्लिश स्कुलमधील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले