कळंब – पाराप्पा सोनवणे यांची वरिष्ठ लिपिक या पदावरून केलेली प्रामाणिक सेवा आणि आयुष्याच्या पंचाहत्तर वर्षातील निस्वार्थ भावनेतील जीवनप्रवास प्रेरणादायी असल्याचे गौरवद् गार मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे यांनी पाराप्पा सोनवणे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात व्यक्त केले.
येथील जनजागृती विद्यालयाचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक पाराप्पा सोनवणे यांचा अमृत महोत्सव सोहळा प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने साक्षी कोचिंग क्लासेसच्या सभागृहात भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक तथा मुख्याध्यापक संघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ७.०० वाजता मोठया दिमाखात संपन्न झाला.
प्रथमतःतथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते पाराप्पा सोनवणे यांचा फेटा,हार शाल, सुभाष घोडके लिखित अग्रलेख व पटनाट्यसंग्रह विरंगुळा हे पुस्तक आणि प्रा.अविनाश घोडके लिखित अद्याक्षरावरील काव्य फ्रेम सप्रेम भेट देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज आडसूळ,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत,ज्ञानदा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बंडू ताटे, समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नवनाथ भंडारे,सुगतकुमार सोनवणे आदींनी पाराप्पा सोनवणे यांच्या जन्मापासून आजतागायत ७५ वर्षातील जीवन प्रवास मांडला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अविनाश घोडके यांनी केले तर आभार इंजि.ऋतुजा वाघमारे यांनी मानले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात