धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.02 मे रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 214 कारवाया करुन 1,85,600 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
शिराढोण पोठाच्या पथकास आरोपी नामे- 1)सुरेश महादेवगरड, वय 50 वर्षे, रा.नायगाव ता.कळंब जि. धाराशिव हे दि.02.05.2024 रोजी 18.15 वा. सु. नायगाव शिवारात शिराढोण मुरुड रोडलगत पत्रयाचे शेडमध्ये अंदाजे 1,015 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये शिराढोण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
उमरगा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-यशवंत बळीराम जाधव, वय 65 वर्षे, रा. मळगीवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 30.04.2024 रोजी 07.00 ते दि. 01.05.2024 रोजी सकाळी 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 1,50,000₹ असा एकुण 2,05,000₹ किंमतीचा माल हा चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- यशवंत जाधव यांनी दि.02.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 457,454,380, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. उमरगा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-प्रेमला मढोळाप्पा डिग्गीकर, वय 65 वर्षे, रा. तावरजा कॉलनी लातुर ता. जि. लातुर या दि. 02.05.2024 रोजी 16.00 वा. सु. बसस्थानक उमरगा येथे बस क्र एमएच 20 बीएल 2184 मध्ये चढत असताना प्रेमला डिग्गीकर यांचे गळ्यातील 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण अंदाजे 60,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रेमला डिग्गीकर यांनी दि.02.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-विलास नागनाथ गायकवाड, वय 52 वर्षे, रा. सलगरा दि. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे सलगरा दी. शिवारातील कृष्णा खोरे साठवण तलावाचे बाजूस उघड्यावर बसविलेली 9000₹ किंमतीची एक ॲनसन कंपनीची स्टार डेल्टा साडेसात एच पी मोअर ही दि.28.12.2023 रोजी 23.00 ते दि. 29.12.2023 रोजी 09.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विलास गायकवाड यांनी दि.02.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
भुम पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)देवीदास नरसु शेलार रा. बह्राणपुर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 25.04.2024 रोजी 05.30 वा. सु. सुभाष काळे यांचे बोअरजवळ उळुप फाटा येथे फिर्यादी नामे- सतिश रामभाउ वारे, वय 52 वर्षे, रा. बह्राणपुर ता. भुम जि. धाराशिव यांना बॅरल मध्ये पाणी भरण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचा मेहुणा हा भाडंण सोडवण्यास आला असता त्यासही नमुद आरोपीने शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सतिश वारे यांनी दि.02.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे 326, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)अनिल गंगाधर हजारे, रा. फुलवाडी ता. तुळजापूर , 2) अविनाश क्षिरसागर, 3) प्रशांत गायकवाड, 4) दयानंद गायकवाड तिघे रा. इटकळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 02.05.2024 रोजी 14.00 वा. सु. फुलवाडी येथे फिर्यादी नामे- निकिता मल्लीनाथ हजारे, वय 18 वर्षे, रा. फुलवाउी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- निकिता हजारे यांनी दि.02.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) छगन रामलिंग तोडकरी, 2) अनुराधा छगन तोडकरी, 3) सरीता सागर तोडकरी, 4) सागर छगन तोडकरी सर्व रा. कौडगाव ता. जि. धाराशिव यांनी दि. 28.04.2024 रोजी 11.00 वा. सु. कौडगाव शिवार येथे फिर्यादी नामे- सतिश रामलिंग तोडकरी, वय 60 वर्षे, र. कौडगाव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतातील उकंडा काढण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन पायाला चावा घेवून जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सतिश तोडकरी यांनी दि.02.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन