कळंब (विशाल पवार ) – थोर समाजसुधारक सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त कळंब शहरातील विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा परिसर येथे स्मारक समितीच्या वतीने शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ.शंकर कांबळे व सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी शेवडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी स्मारक समितीचे विश्वस्त बौद्धाचार्य डॉ.सुनील गायकवाड,शिवाजी सिरसट,राजाभाऊ गायकवाड, सुमित रणदिवे,प्रा.अरविंद खांडके,प्रकाश धावारे,भाऊसाहेब कुचेकर,अविनाश घोडके,सूरज गायकवाड,सागर पट्टेकर,सुभम गायकवाड,कोमल धावारे,विशाल धावारे आदी समितीतील सर्व पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले