August 9, 2025

कळंब तालुका कार्याध्यक्षपदी सोपान पवार यांची निवड

  • प्रतिनिधी (महेश फाटक) – विद्याभवन हायस्कूल कळंब या प्रशालेतील मराठी विषयाचे नवोपक्रमशील सहशिक्षक सोपान पवार यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कळंब तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांनी अध्यापन कार्याबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी , गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम प्रशालेत राबविलेले आहेत महाराष्ट्रा राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे बालभारती सदस्य कार्यशाळेसाठी निवड, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे शिक्षण संक्रमण लेखक कार्यशाळेसाठी निवड व शिक्षण संक्रमणामध्ये लेख प्रसिद्ध ,महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे आयोजित नवोपक्रम स्पर्धेत जिल्हास्तर राज्य स्तरावर निवड, महाराष्ट्र शासन विद्या प्राधिकरण पुणे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण राज्यस्तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड अविरत मास्टर ट्रेनर मराठी विषयाचे विभागस्तर ,जिल्हास्तर तालुकास्तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शोधनिबंध सादर व सहभाग त्याचबरोबर विविध शैक्षणिक कार्यावर लेखन राज्यस्तर, जिल्हास्तर निबंध लेखन पुरस्कार प्राप्त व सहभाग, अखिल भारतीय साने गुरुजी कथामालीच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन तालुकास्तरावर विविध उपक्रम वक्तृत्व स्पर्धा, साहित्यिकांच्या मुलाखती, वृक्षारोपण, पक्षी संवर्धन विषयक उपक्रम, कथाकथन ,सामान्य ज्ञान स्पर्धा, संस्कार परीक्षा ,निबंध लेखन स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा, यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त चित्र प्रदर्शन व पुस्तक प्रदर्शन, वाद विवाद स्पर्धा ,इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे अनेक शाळेत मार्गदर्शन, जिल्हास्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित, राज्यस्तर, जिल्हास्तर ,राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, इयत्ता दहावी गुणवत्ता विकास कार्यक्रमासाठी मराठी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण जिल्हास्तर, तालुकास्तर, तज्ञ मार्गदर्शक निवड, अशा विविध शैक्षणिक उल्लेखनीय कार्य करत असल्यामुळे नवोपक्रमशील सहशिक्षक सोपान पवार यांच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष परमेश्वर पालकर, कळंब तालुका अध्यक्ष आश्रुबा कोठावळे या मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व या निवड प्रसंगी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा.
error: Content is protected !!