August 9, 2025

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सन्मान सोहळा

  • कळंब – प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था,कळंब आयोजित विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त तात्यासाहेब सोनवणे,विजय गायकवाड तसेच अँड.त्र्यंबक मनगिरे यांच्या ८० व्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन व भजनी मंडळातील कलावंत यांचा सन्मान सोहळा दिनांक ५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ४.३० वाजता श्री.संत ज्ञानेश्वर माऊली निराधार बालकाश्रम,तांदुळवाडी रोड, कळंब येथे ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही.सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.
  • या सन्मान सोहळ्याचे उदघाटन डॉ.संजीवनी जाधवर यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ साहित्यिक रमेश बोर्डेकर, ह.भ.प महादेव महाराज आडसुळ,डी. के.कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत व प्रा. अविनाश घोडके यांनी केले आहे.
error: Content is protected !!