कळंब ( जयनारायण दरक ) – वाशी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पारा अंतर्गत असणाऱ्या मांडवा उपकेंद्र येथे ”फिरती मोबाईल व्हॅन दवाखाना “या शिबिराचे उद्घाटन दि.२१ मार्च २०२४ रोजी गावातील नागरिक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्हॅन चे प्रमुख डॉ.फैज खान यांनी रुग्णाची तपासणी केली.रक्त, लघवी तपासणी मोरे यांनी फार्माशिष्ट यांनी रुग्णाला औषधी दिले, यावेळी पारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जाधव कोठावळे मॅडम,डॉ.प्रियंका बिक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मगर यांनी गरोदर माता ची तपासणी केली, यावेळी आरोग्य सेविका सौ.शिंदे,आरोग्य सहाय्यक मेटे,आरोग्य कर्मचारी जोगदंड,आशा कार्यकर्ती सौ. काळे,जावळे,गरड,अर्धवेळ कर्मचारी सौ क्षिरसागर ,गावचे सरपंच व गावकरी,आशा कार्यकर्ती यांनी या शिबिराला सहकार्य केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले