August 9, 2025

महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन

  • कळंब – प्रबुद्ध रंगभूमी बहूउद्देशीय संस्था कळंब आयोजित भारत जोडो अभियान अंतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिला सन्मान सोहळा दिनांक १२ मार्च २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता श्री संत ज्ञानेश्वर निराधार माऊली बालकाश्रम,तांदुळवाडी रोड,कळंब येथे आयोजित करण्यात आला आहे.
    या सोहळ्यात भजनी मंडळातील महिलांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.सरस्वती महादेव आडसूळ या राहणार असून सौ.शुभांगी कैलास घाडगे पाटील,प्रा.डॉ.सौ.मीनाक्षी श्रीधर भवर,माजी सरपंच अनुराधा हरिभाऊ कुंभार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
    तरी या कार्यक्रमासाठी भजनी महिला मंडळातील महिला कलावंतांनी हजर राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुभाष द.घोडके व ह.भ.प महादेव महाराज आडसूळ यांनी केले आहे.

error: Content is protected !!