August 9, 2025

चेअरमनपदी बोंदर तर व्हा.चेअरमन पदी अडसूळ यांची बिनविरोध निवड

  • गोविंदपूर (अविनाश सावंत ) –
    कळंब तालुक्यातील देवधानोरा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित देवधानोराच्या चेअरमनपदी सोमनाथ(आबा)बोंदर व्हा.चेअरमन पदी मोहनराव अडसूळ यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ए.टी.सय्यद,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नितीन गोडसे यांनी कामकाज पाहिले.
    यावेळी सोमनाथ बोंदर,मोहन माधव अडसूळ,दिगंबर दत्तू बोंदर,सतीश वसंतराव कुलकर्णी,हनुमंत गणपती बोंदर,नामदेव चांगदेव बोंदर,समाधान महादेव कराड,श्रीकृष्ण संदिपान बोंदर,आशा विश्वनाथ बोंदर,भाग्यश्री तानाजी सावंत,जयश्री रंगनाथ वाघमारे,नागोराव नारायण कुंभार,चंद्रकांत चत्रभुज बोंदर, हे सर्व संचालक उपस्थित होते. तसेच यावेळी गावचे ज्येष्ठ नागरिक बाबासाहेब गोपाळराव बोंदर, बलभीम चत्रभूज बोंदर, गणपती माधव बोंदर, बाबासाहेब(मेजर)बोंदर, लक्ष्मण सोपान गायकवाड, खंडू शिवाजी थोरात उप सरपंच, किसन जनार्दन बोंदर,विश्वनाथ अच्युत बोंदर, तानाजी शेषराव सावंत,महावीर बोंदर, बालाजी दिगंबर बोंदर, शैलेश क्षीरसागर, कविराज बोंदर उपस्थित होते.
error: Content is protected !!