शिराढोण (परमेश्वर खडबडे ) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संतोषजी राऊत यांनी लोक कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था शेळका धानोरा तथा नेहरू युवा मंडळ कळंबचे सचिव कमलाकर शेवाळे यांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ” पुरस्कार मिळाल्याबद्दल दि.१७ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्या स्वग्रही हासेगाव ( शिराढोण ) येथे शाल,श्रीफळ,बुके तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करून मान सन्मान केला. या कार्यक्रमाचे प्रसंगी नेहरू युवा मंडळ कळंबचे अध्यक्ष ज्योतीराम सोनके,डोळस धनंजय,चंद्रकांत वाघमारे,शरद सूर्यवंशी तसेच गावकरी मंडळी ,आदीं यावेळी बहुसंखेने उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले