धाराशिव – राष्ट्रीय सेवा योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,उप परिसर धाराशिव यांचे खेड येथे आयोजित विशेष वार्षिक श्रम संस्कार शिबिराचा (दि. १२ फेब्रुवारी) समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. प्रशांत चौधरी, व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय, धाराशिव यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. विद्यापीठ उउपपरिसराचे संचालक डॉ. पी. पी. दिक्षित हे अध्यक्षस्थानी होते. तर खेड गावाचे सरपंच सुनील गरड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मेघश्याम पाटील, रासेयो कार्यक्रमाधिकारी यांनी केले. त्यांनी शिबिराची उदिष्टये आणि विद्यार्थ्यांना या शिबिराचा कशाप्रकारे फायदा होईल हे नमूद केले. डॉ.जितेंद्र शिंदे, रासेयो कार्यक्रमाधिकारी यांनी शिबिराचा विस्तृत अहवाल सादर केला . त्यात शिबिराचे उद्घाटन ते समारोप पर्यंत झालेले सर्व कार्यक्रमांचा विस्तृत आढावा मांडला. या शिबिरातून आम्ही कार्यक्रमाधिकारी बरेच काही शिकलो, तसेच विद्यार्थीपण खूप काही गोष्ठी शिकल्या असतील असा आशावाद त्यांनी विषद केला. त्यांनी खेड गावामध्ये गावकर्यांनी सरपंच सुनील गरड यांच्या मार्गदर्शनातून केलेली कामे हि उत्कृष्ट आहेत, व ती कामे शिवारफेरी च्या माध्यमातून आम्हाला दाखविल्या बद्दल आभार व्यक्त केले. शिबिरार्थी राजेश कोळी व योगिनी गुंजीटे यांनी शिबिराबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यात त्यांना शिबीरातून काय नवीन मिळाले याची मांडणी केली , गावकर्यांनी शिबिराला चांगला प्रतिसाद दिला, ते अत्यंत मायेने आमची विचारपूस करत होते असे नागरिकासाठी गौरोवोद्गार शिबिरार्थींनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मुख्य वक्ते प्राचार्य डॉ. प्रशांत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये कसा सकारात्मक बदल होतो आणि त्याचा उपयोग आपल्या भावी आयुष्यात कसा होतो हे उदाहरणासहीत विषद केले. तसेच त्यांनी आर्ट लिव्हिंग च्या माध्यमातून योग व ध्यान वर आधारित कार्यक्रमाची स्तुती केली. तसेच योग व ध्यान याचे आपल्या दिनचर्येमध्ये समावेश केला पाहिजे असा आशावाद व्यक्त केला. सरपंच सुनील गरड यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आयुष्यामध्ये शिस्त महत्त्वाची असते व ती अशा शिबिरातून शिकायला मिळते, असे सोदाहरण सांगितले. शिबिरामध्ये आपल्यातील कमतरतांची जाणीव होते व नवीन शिकायला मिळते. आपण छंद जपायला पाहिजे. त्यांनी विद्यार्थ्यांना छंद आणि व्यसन यातील फरक स्पष्ट केला. छंद हा आपल्याला करिअर घडविण्यास मदत करू शकते असे विचार त्यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी गावामध्ये विद्यार्थ्यांनी श्रमदानातून केलेली कामे व गावाकऱ्यांसाठी आयोजित केलेले कार्यक्रम याची स्तुती केली. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. राहुल खोब्रागडे यांनी व्यक्त केले. डॉ. खोब्रागडे यांनी विद्यापीठ प्रशासन, प्रा. डॉ. पी. पी. दिक्षित, संचालक विद्यापीठ उपपरीसर,प्रा. डॉ. सोनाली क्षीरसागर, संचालक, रासेयो, सुनील गरड, सरपंच खेड, शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचा विशेष उल्लेख केला. तसेच त्यांनी शिबारातील प्रत्येक व्यक्त्यांचे, नाटकातील सहभागी कलाकार, शिबारार्थी, समस्त खेड गावकरी यांचेही आभार व्यक्त केले. आपल्या आभारामध्ये त्यांनी प्रामुख्याने आर्ट ऑफ लिव्हिंग तसेच रोटरी क्लब धाराशिव यांच्या माध्यमातून घेतलेले कार्यक्रम, शिवार फेरी तसेच अनेक गोष्टींचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायाल जाधव व ऋतुजा लबडे यांनी केले.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी