कळंब – मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखान यांनी स्वराज्यावर केलेल्या आक्रमणामुळे होणारी रयतेची छळवणूक थांबविण्यासाठी व रयत सुखी राहावी यासाठी शिवाजी महाराज यांनी पुरंदरचा तह केला या तहात 23 किल्ले चार लाख होन उत्पन्नाचा मुलुख व पुत्र शंभुराजे यांच्यासाठी मनसबदारी मान्य करून मिर्झाराजे जयसिंग यांच्याकडे पाठविले हा प्रसंग सर्वात नामुष्की सर्वस्व गम विनारा होता परंतु हे सर्व संकटाचा महाराजांनी मोठ्या युक्तीने सामना केला असे विचार प्रसिद्ध शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी शिव शिवा तालीम संघ शिवजन्मोत्सव समिती कळंब आयोजित शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका या विषयावर व्याख्यान देत असताना व्यक्त केले व आग्रा भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात मिळालेली वागणूक याप्रसंगी दाखवलेला स्वाभिमान यानंतर आग्रा येथून परत स्वराज्यात दाखल होईपर्यंत प्रसंग इतिहासातील नोंदी व दाखले देत आपल्या पहाडी आवाजात मांडले. याविषयी पुढे बोलताना शिवरत्न शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची गुप्तहेर यंत्रणा प्रभावी होती आग्र्याहून सुटका हे या यंत्रणेचे यश आहे यासाठी बहिर्जी नाईक यांनी केलेली कामगिरी याला तोड नाही असे सांगितले.महाराष्ट्र ही थोर महात्म्यांची भूमी असून याला एक वेगळा सुगंध आहे.मराठी मातीत तुमचं आमचं जन्म झाला हे आमचे भाग्य आहे असे गौरव उद्गार काढले कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित कळंब शहरातील डॉक्टर्स यांच्या हस्ते करण्यात आले जिजाऊ वंदना घेतल्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित डॉक्टर्स,डॉ.माणिकराव डिकले,डॉ.रमेश जाधवर,डॉ. सुरेश वाघ डॉ.अमित पाटील ,डॉ. सुशील डेंगळे,डॉ.दीपक कुंकूलोळ,डॉ.राजेंद्र बावळे डॉ. सुनील थळकरी,डॉ.सचिन पवार,डॉ.गिरीष कुलकर्णी,डॉ. प्रशांत काकडे,डॉ.शेळके,डॉ. सुशील अडसूळ याचबरोबर नागनाथ घुले,सुनील लाटे,निलेश होनराव,विकास गडकर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांचा शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवाजी कदम यांनी सत्कार केला तर आमदार कैलास (दादा) घाडगे पाटील यांचा सत्कार शिवजन्मोत्सव समितीचे मार्गदर्शक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांनी केला.
धाराशिव येथून उपस्थित पंकज पाटील व सोमनाथ गुरव यांचाही सत्कार करण्यात आला.उपस्थित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.महादेव गपाट व रमेश शिंदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजन्म उत्सव समितीचे अतुल कवडे ,निखिल यादव,गणेश भवर ,गोविंद चौधरी,दादा खंडागळे ,नामदेव पौळ, तानाजी कापसे ,प्रताप शिंदे बालाजी कापसे ,अनिकेत इंगळे ,शुभम शेडगे,राजाभाऊ गरड यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
More Stories
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका प्रा.सौ.अंजलीताई मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट