August 9, 2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

  • धाराशिव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) जिल्हा कार्यालय धाराशिव येथे दि.12 फेब्रुवारी 2024 रोजी नगरसेवक अशोक पेठे तसेच वाजिद इस्माईल शेख यांचा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षांमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला. सद्यस्थितीमध्ये जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या जिल्ह्यातील नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असल्याचे दिसून येत आहे.
    धाराशिवचे नगरसेवक अशोक पेठे यांची सामाजिक न्याय विभाग धाराशिव शहर कार्याध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते व सामाजिक न्याय विभाग धाराशिव जिल्हाध्यक्ष अतुल जगताप यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्त पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या सोबत ज्येष्ठ नेते समीयोद्दीन मशायक,धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष असद खान पठाण, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर,सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार, सामाजिक न्याय धाराशिव शहर अध्यक्ष विक्रम कांबळे, केशेगाव जि.प गटप्रमुख लिंबराज लोखंडे, आंबेजवळगाव जि.प. गटप्रमुख सुरेश राठोड, धाराशिव तालुका संघटक कलीम शेख आदी पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.
error: Content is protected !!