August 9, 2025

ओबीसी समाजाच्या वतीने शासनाने काढलेल्या राजपत्राचा निषेध

  • कळंब – राज्य शासनाने मराठा आरक्षणा संदर्भात सगेसोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने काढलेल्या राजपत्राचा निषेधार्थ ना. छगनराव भुजबळ यांनी दिलेल्या आदेशा नुसार कळंब तालुका व शहर सकल ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आला आहे.या बाबत कळंबच्या तहसीलदार यांना निवेदन देऊन मागण्या शासन दरबारी मांडण्याची मागणी करण्यात आली आहे.
    या निवेदनात असे म्हटले आहे कि,राज्य शासनाने मराठा आरक्षणा संदर्भात सगेसोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने काढलेल्या राजपत्राचा असाधारण भाग ४ ब दिनांक २६ जानेवारी २०२४ नुसार मसुदा काढण्यात आला आहे.त्यामुळे ओबीसी समजा मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शासनाचा हा निर्णय ओबीसी वर अन्याय करणारा आहे.त्याच बरोबरोबर शिंदे समिती हि घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारशीवरून कुणबी प्रमाणपत्रे देणे हे घटना बाह्य आहे.या सर्व मागण्याच्या निषेधार्थ कळंब शहर व तालुका सकल ओबीसी भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांच्या वतीने तहसील कार्यालयात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
    हे आंदोलन ओबीसी संघटनेचे नेते धनंजय शिंगाडे,पांडुरंग कुंभार यांच्या मार्गदर्शनात ओबीसी संघटनेचे नेते शहाजहान शिकलगार , हरिभाऊ कुंभार,सचिन गायकवाड,मुस्ताक कुरेशी,ज्योतिराम कोरे अनंत वाघमारे,नानासाहेब धाकतोडे, प्रेमचंद गोरे,महेश बर्वे, संजय वाघमारे निलेश पांचाळ ,प्रा.संजय कांबळे,हरिदास जाधव , दिपक जाधव,बाळासाहेब यादव, महेश पुरी, बाळासाहेब जाधव, विठ्ठल पवार, संभाजी करपे, उत्तरेश्वर देशमाने,निलेश शिंदे,अरुण नरहिरे, शामसुंदर वेदपाठक ,बालाजी राऊत,नामदेव पौळ, अंकुश वाघमारे, गणेश काळे,कैलास पांचाळ,सुदाम देवकर,अरुण गिरी,शरद बन,अशोक भाग्यवंत,विशाल राक्षे,ए. के.सय्यद,मुबारक पठाण,एस शिनगारे,प्रशांत वेदपाठक,बिभीषण कुंभार,बापूराव सुरवसे,कल्याण मंडाळे, ज्ञानेश्वर पंडित,आणीसोद्दीन काझी,राजेश शिंदे,मकसूद शिकलगार, शाम भांडे,अरुण जाधवर, जिव्हेश्वर कुचेकर, रणजित गवळी,रमेश माळी, शाम वेदपाठक संजय कोळी,शंकर कराड,सुजित धाकतोडे, अजित धाकतोडे,शिवाजी सावंत,सचिन डोरले, कल्याणकर शाम,इस्माईल हन्नूरे,विष्णू मंडाले,विशाल कुंभार,रमेश कुंभार, बाळासाहेब विटेकर,रामभाऊ कुंभार,शिवाजी कोरे,हरिदास कुंभार,सचिन शेंडगे,कलीम तांबोळी,सोपान कोकाटे,महेश जगताप,अशोक धाकतोडे, अनिकेत धाकतोडे,सत्यवान सौलाखे,महेश इटकर, उळगे रमेश,विनोद जाधव,दिपक माळी, प्रसाद काळे,रवि गोरे,संतोष भांडे,भरत परळकर, गोपाळ उच्चके,व्यंकट खांडेकर,मनोज माळी, विठ्ठल जाधव,अरुण माळी बालाजी सुरवसे,कृष्णा जगताप,अजय माळी, प्रभाकर खांडेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
error: Content is protected !!