कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या युवकांचा ध्यास ग्राम- शहर विकास हे सात दिवसीय शिबिर डिकसळ येथे संपन्न झाले . या शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी 23 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाळासाहेब मैंद जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना विभाग धाराशिव बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अशोकराव मोहेकर सचिव ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा, व, प्रा. पंडित शिंदे , छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब,तर अध्यक्ष म्हणून डॉ. सुनील पवार प्राचार्य, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब.व प्रमुख उपस्थितीमध्ये उपप्राचार्य, प्रो. सतीश लोमटे, उपप्राचार्य, प्रो. हेमंत भगवान उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. मैंद म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वार्षिक शिबिरातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो . लोकशाहीचे मूल्य, नेतृत्व गुण, स्टेज करेज,सहिष्णुता, बंधुभाव सर्वधर्मसमभाव, समाजसेवा राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी इत्यादी गुण राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक श्रमसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवले जातात व त्याचा वापर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होत असतो असे प्रतिपादन यांनी केले .तसेच ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी काळानुसार आपल्यामध्ये बदल करावा व काळानुसार आपल्या मध्ये गुणांची वाढ करून या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये यशस्वी व्हावे .त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी या ब्रीद वाक्याचा अर्थ सांगितला तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधचिन्हाचा अर्थ सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. याप्रसंगी प्रा. पंडित शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अनुजा वाघमारे ,प्रतीक्षा अडसूळ,कृष्णा तांबडे,सौरभ क्षिरसागर या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.सुनील पवार यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःमधील आत्मभान ठेवून ध्येय ठरवावे व त्यानुसार वाटचाल करून यशस्वी व्हावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मीनाक्षी जाधव यांनी तर प्रास्ताविक डॉ. नामानंद साठे यांनी तर आभार प्रा.अर्चना मुखेडकर ,अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक यांनी मानले .याप्रसंगी डॉ.दत्ता साकोळे डॉ.कमलाकर जाधव, डॉ ईश्वर राठोड, प्रा. नितीन अंकुशराव ,लेफ्टनंट डॉ. हरिभाऊ पावडे,डॉ. श्रीकांत भोसले,प्रा. अमोल शिंदे,प्रा सूरज पाटील, प्रा. मेहराज तांबोळी,प्रा.शाहरुख शेख,प्रा. रोहिणी लोहकरे, प्रा.व कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप महाजन व हनुमंत जाधव अधीक्षक तथा अध्यक्ष, तंटामुक्ती समिती मौजे डिकसळ ,सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे,अर्जुन वाघमारे, दिलीप , कमलाकर बंडगर ,विपुल धाकतोडे,संदिप सूर्यवंशी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले