August 9, 2025

छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे रा.से.यो विशेष शिबीराचे आयोजन

  • कळंब- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब व आयक्युएसी/रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षणाची ज्योत पेटवु,बालविवाह समूळ मिटवू’या विशेष वार्षिक शिबीराचे दि. २४/०१/२०२४ ते ३०/०१/२०२४ या कालावधीत लोहटा(प) ता.कळंब जि.धाराशिव येथे आयोजित करण्यात आले आहे.या शिबीराचे उदघाटन गुरुवार दि.२४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ठिक ११.३० वा.होणार आहे.उदघाटन सचिव शिवाजी कापसे,डॉ.सोनाली क्षीरसागर व सरपंच स्वाती संजय आडसूळ यांच्या शुभहस्ते होणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य.शशिकांत जाधवर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य.डॉ.साजेद चाऊस असून प्रमुख उपस्थिती मध्ये सहसचिव प्रा.संजयजी घुले,बाळकृष्ण गुरसाळे, रविकांत पवार,बाबुराव खोसे,संगीता अनपट तसेच कार्यक्रमाधिकारी प्रा.ज्योतीराम जाधव प्रा.सौ.मनिषा कळसकर , डॉ.महेश पवार प्रा.अमोल शिंगटे प्रा.विनायक मिटकरी व कु.गायत्री चोंदे यांच्या उपास्थितीत होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थानी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित रहावे.असे आव्हान प्राचार्य यांनी केले आहे.
error: Content is protected !!