- कळंब – महाराष्ट्रातील सामाजिक संघर्षाचे प्रतीक असणाऱ्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातील सर्व वीर शहिदांना नामांतर दिनी विनम्र अभिवादन करण्यासाठी “एक दिवस समाजासाठी” या बोधवाक्याखाली शहरात दि.१४ जाने २०२४ रोजी नामांतरदिनाच्या ३० व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
नामांतर आंदोलन हे १९७६ ते इ.स.१९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले बौद्ध चळवळीचे आंदोलन होते. औरंगाबाद येथील ‘मराठवाडा विद्यापीठा’ला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही ‘सरकारी मागणी’ या आंदोलनाची होती. शेवटी सोळा वर्षाच्या संघर्षानंतर या विद्यापीठाचे नाव बदलून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे नामांतर नव्हे तर नामविस्तार करण्यात आला.
शहरातील सर्व युवा भीम सैनिक यांनी नामांतरदिनाच्या ह्या भव्य बाईक रॅलीत सहभागी होण्यासाठी सर्वांनी बायपास रोडला ठीक १०.०० वाजता उपस्थित राहावे असे आवाहन कळंब शहरातील सर्व भीमसैनिकांच्या वतीने करण्यात आले आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले