कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सलंग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब अंतर्गत रासेयो/आयक्युएसी व जिजाऊ युवती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती तसेच युवा दिनानिमित्त दि.१२–०१-२०२४ रोजी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद व संस्थेचे संस्थापक कै.नरसिंग (आण्णा) जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे व वक्ते डॉ.वर्षा जाधव प्राचार्य.शशिकांत जाधवर रासेयो विभाग प्रमुख प्रा.ज्योतीराम जाधव व जिजाऊ युवती मंचचे सदस्य डॉ.विद्युलता पवार, प्रा. मनिषा कळसकर ,प्रा. सुनिता चोंदे, श्रीमती सारिकाताई पडवळ या मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख व वक्ते डॉ.वर्षा जाधव यांनी माँसाहेब जिजाऊंच्या उत्तुंग आदर्श कार्या विषयी सखोल मार्गदर्शन केले.तसेच स्वामी विवेकानंद जयंती प्रसंगी युवा दिन का साजरा केला जातो यासंबंधी स्वामी विवेकानंदांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्याना संबोधित केले.तसेच प्राचार्य शशिकांत जाधवर यानी अध्यक्षीय समारोपात माँसाहेब जिजाऊँ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी कॉलेजमधील विद्यार्थिनी कु.प्रियंका देवकर व कु.प्रतिक्षा गायकवाड यानी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.रघुनाथ घाडगे यानी केले.सुत्रसंचालन प्रा.मनिषा कळसकर यांनी केले.आभार आयक्युएसी समन्वयक डॉ.अनिल जगताप यानी मानले.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनीं व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले