August 9, 2025

दिव्यांगाच्या विशेष शाळेची क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील यश

  • धाराशिव – दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांच्या विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा कार्यशाळा मधील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि.२०,२१ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील विशेष शाळांमधील २८ शाळांनी सहभाग नोंदवला होता.या दोन दिवशी दिव्यांग दिन उत्साहात पार पाडला.
    दिव्यांग दिनाच्या पहिल्या दिवशी तुळजाभवानी स्टेडियम येथे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन राहुल गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते झाले.
    क्रीडा स्पर्धा मध्ये चॅम्पियन ट्रॉफी मूकबधिर प्रवर्गातून संत ज्ञानेश्वर महाराज मूकबधिर निवासी शाळा कळब प्रथम क्रमांक तर सोजर मूकबधिर निवासी शाळा भूम यांना द्वितीय क्रमांक. तर तृतीय क्रमांक निवासी मूकबधिर निवासी शाळा उमरगा. तर मतिमंद प्रवर्गातून स्वाधार मतिमंद मुलीचे बालगृह आळणी यांनी प्रथम क्रमांक तर तुळजाभवानी मतिमंद मुलांचे बालगृह एकुर्गावाडी यांना द्वितीय क्रमांक. तर सोजर मतिमंद निवासी शाळा कळम यांना तृतीय क्रमांक मिळाला. अस्थिव्यंग कार्यशाळा प्रकारामधून शांतेश्वर अपंग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सास्तुर. या शाळेने चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. तर ते द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी नवजीवन अपंग प्रशिक्षण केंद्र खानापूर. आणि ब्रिलियंट अपंग प्रशिक्षण केंद्र आंबेवाडी यांनी तृतीय क्रमांक मिळवत चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. मतिमंद कार्यशाळेतून स्वाधार मतिमंद कार्यशाळा आळणी.यांनी प्रथम क्रमांक मिळवत चॅम्पियन ट्रॉफी पटकाविली. तर अस्थिव्यंग शाळा प्रकारातून निवासी शाळा सास्तुर यांनी प्रथम क्रमांक पटकावत चॅम्पियन ट्रॉफी पटकावली तर तर द्वितीय क्रमांक डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्थिव्यंग शाळा होर्टी तर तृतीय क्रमांक कै. उद्धवराव जी पाटील अस्थिव्यंग शाळा धाराशिव.यांनी चॅम्पियन ट्रॉफी पटकावली.
    तर दुसऱ्या दिवशी शिवछत्रपती नाट्यगृह नगरपालिका धाराशिव येथे सांस्कृतिक स्पर्धा झाल्या या स्पर्धेत अस्थिव्यंग कार्यशाळेतून शांतेश्वर अपंग व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सास्तुर या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक ब्रिलियंट अपंग प्रशिक्षण केंद्र आंबेवाडी.यांनी तर नवजीवन अपंग प्रशिक्षण केंद्र खानापूर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
    तर मतिमंद कार्यशाळेतून स्वाधार मतिमंद मुलींचे बालगृह आणि यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अंधप्रवर्गातून संत कबीर अंध विद्यालय धाराशिव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मूकबधिर प्रवर्गातून निवासी मूकबधिर शाळा उमरगा यांनी प्रथम. तर संत ज्ञानेश्वर महाराज मूकबधिर शाळा कळंब द्वितीय. तर मूकबधिर निवासी शाळा जुनोनी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. मतिमंद प्रवर्गातून स्वाधार मतिमंद मुलींचे बालगृह आळणी त्यांनी प्रथम क्रमांक तर नागनाथ मतिमंद निवासी शाळा खानापूर येणे द्वितीय तर सोजर मतिमंद शाळा कळब यांनी तृतीय क्रमांक मिळवला. अस्थिव्यंग प्रवर्गातून प्रथम क्रमांक निवासी अपंग शाळा सास्तुर.द्वितीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिवंग निवासी शाळा होर्टी. तर तृतीय उद्धवराव पाटील अस्थिव्यंग शाळा धाराशिव.यांनी मिळवले. सांस्कृतिक स्पर्धेत विविध संघाने एकाहून एक सरस नृत्य सादर करून परीक्षकासह उपस्थिततांची दाद मिळवली. छत्रपती शिवाजी महाराज संस्था नाट्यगृहामध्ये पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी शिंदे यांच्या हस्ते विजेता संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर सचिन इगे, मुख्य लेखा वित्त अधिकारी श्याम गोड भरले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नितीन भोसले कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग,मयूर काकडे जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना,देवदत्त गिरी जिल्हा समाज अधिकारी जिल्हा परिषद, मोहन चव्हाण कार्यालयीन अधीक्षक, सुधीर जाधवरसहाय्यक लेखाधिकारी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद,अँड.बी.आर. कलवले,शहाजी चव्हाण, प्रताप भायगुडे, रशीद कोतवाल, जुनेद शेरीकर,नितीन सरवदे, बालाजी शिंदे,चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते तसेच यावेळी दिव्यांग शाळेतील चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे ही पारितोषिक वितरण करण्यात आले.तसेच दिव्यांग शाळेतून आदर्श शिक्षक व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील जे कर्मचारी यावर्षी सेवानिवृत्त होणार आहेत किंवा झाले आहेत. यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
    या दोन दिवशी कार्यक्रमास विविध समित्या नियुक्त करण्यात आल्या होत्या त्यामध्ये नियोजन समिती प्रमुख प्रताप भायगुडे, क्रीडा समिती प्रमुख गवळी, पी एस.भोजन,समिती प्रमुख अशोक उमाप, सांस्कृतिक समिती प्रमुख डुकरे ए.बी,स्वागत समिती प्रमुख बालाजी नादरगे, स्टेट सजावट बैठक व्यवस्था प्रमुख अरुण बेंबडे. पारितोषिक व पुरस्कार समिती नाना शिरसाट. निवास व्यवस्था प्रमुख पांडुरंग जाधव.प्रसिद्धी प्रमुख शकील शेख यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
    या कार्यक्रमाचे उत्कृष्टपणे असे नियोजन केल्याबद्दल पार पडल्याबद्दल देवदत्त गिरीजिल्हा समाज कल्याण अधिकारी,मोहन चव्हाण कार्यालयीन अधीक्षक, सुधीर जाधवर सहाय्यक लेखाधिकारी,बालाजी लोमटे. या स्पर्धेचे आयोजन व नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला.
    या कार्यक्रमास जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक. शिक्षकेतर कर्मचारी. पालक वर्ग. विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी नादरगे यांनी केले. तर आभार कार्यालय अधीक्षक मोहन चव्हाण यांनी केले.
error: Content is protected !!