August 9, 2025

मो.हरसा पठाण शटल रन स्पर्धेत पहिला क्रमांकाने विजयी

  • धाराशिव (जयनारायण दरक) –
    स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी फरहान पठाण यांचे चिरंजीव मोहम्मद हरसा पठाण यांना शटल रण मध्ये पहिला क्रमांक आल्याने पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या पत्नी सौ.अस्मिता ओंबासे व सौ.नितिका विलास (उपायुक्त आयकर विभाग),जनरल मॅनेजर लातूर नांदेड हब प्रसाद पोंक्षे यांच्या हस्ते सुवर्णपदक देण्यात आले.
    यावेळी पोतदार इंग्लिश स्कुलच्या प्राचार्या रमैया तुतीका,मुख्याध्यापिका शिला टाक,प्रशासक अधिकारी जीवन कुलकर्णी यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंद,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
    मोहम्मद हरसा पठाण याचेसुवर्ण पदक मिळवल्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
error: Content is protected !!