धाराशिव – महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत धाराशिव येथील कौशल्य विकास विभाग यांच्या मार्फत जिल्हा स्तरीय “नवसंकल्पना” स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परीसर धाराशिव येथे दिनांक १५ डिसेंबर रोजी घेण्यात आल्या. उद्घाटन प्रसंगी कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव,कार्यक्रम अध्यक्ष व व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ.सुयोग अमृतराव, जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी प्रविण आवताडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे उपस्थित होते. सदर स्पर्धेत परीक्षक म्हणून उद्योग संघटनेचे संजय देशमाने, छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील उप प्राचार्य डॉ.संजय अस्वले, आद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मनोज चौधरी, श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर येथील प्रा. दीपक पौळ उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान विविध पाहुण्यांनी नाविन्यता, उद्योग आणि नव कल्पना या बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात निवडलेले सहभागी संघाचे आणि महाविद्यालय प्रतिनिधी यांचे सत्कार केले गेले. उद्घाटनाचे सूत्रसंचालन डॉ. विक्रम शिंदे तर आभार डॉ. सचिन बेसैये यांनी मानले. दुसऱ्या सत्रात जिल्ह्यातील निवडलेल्या १० संघाचे सादरीकरण घेण्यात आले. यात नव संकल्पना मार्फत विविध सामाजिक, उद्योग आणि व्यवसाय बाबतीत नवीन कल्पना मांडण्यात आल्या. मॉडेल, पोस्टर तसेच पीपीटी द्वारे सहभागी स्पर्धकांनी मांडणी केली. सादरीकरणात प्रश्न उत्तरे यांचे देखील निरसन परीक्षक मार्फत करण्यात आले. यातील निवडलेल्या संघाना २६ जानेवारी रोजी एक लक्ष रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. यातूनच पुन्हा राज्यपातळीवरती निवड केली जाणार आहे आणि राज्य पातळी वरती पाच लाख रुपये बक्षीस जाहीर केले जाणार आहे. जिल्ह्यात यामुळे नवकल्पना बाबत सकारात्मक वातावरण तयार होत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन साठी कौशल्य विकास विभाग आणि व्यवस्थापन शास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परीसर धाराशिव यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम डॉ. सचिन ओंबासे जिल्हाधिकारी धाराशिव आणि कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन