धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.12 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 148 कारवाया करुन 1,14,500 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
कळंब पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)संगिता शंकर काळे, वय 42 वर्षे, रा. कन्हेरवाडी,ता.जि. धाराशिव या दि.12.12.2023 रोजी 17.36 वा. सु. कन्हेरवाडी येथे अंदाजे 750 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 2)रमेश सुरदास गरड, वय भिमराव उर्फ लाला राजाराम काळे, वय 45 वर्षे, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब जि. धाराशिव हे दि.12.12.2023 रोजी 17.45 वा. सु. कन्हेरवाडी येथे अंदाजे 750 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आरोपी नामे 1)लक्ष्मण नामदेव कोरे, वय 39 वर्षे, रा. चिवरी, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.12.12.2023 रोजी 12.00 वा. सु. लक्ष्मी मंदीराच्या उत्तर बाजूला मोकळे जागेत चिवरी येथे अंदाजे 2,660 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 38 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. तर 2)खंडेराव महाप्पा गाडेकर, वय 30 वर्षे, रा. येणेगुर, ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.12.12.2023 रोजी 18.00 वा. सु. विठ्ठलसाई साखर कारखाना समोरील रॉयल धाबा समोर सुंदरवाडी शिवार येथे अंदाजे 3,810 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 17 सिलबंद बाटल्या व 38 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये नळदुर्ग व मुरुम पो ठाणे येथे गुन्हे नोंदविले आहेत.
आंबी पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)नानासाहेब संदीपान गरदाडे, रा. मुगाव ता. परंडा जि. धाराशिव हे दि.12.12.2023 रोजी 16.30 वा. सु. मुगाव येथे आपल्या किराणा दुकानाच्या आडोशाला अंदाजे 910 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये आंबी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
कळंब पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.12.12.2023 रोजी 15.05 वा. सु. कळंब पो. ठा. हद्दीत सोनार लाईन जाणारे रोडच्या बाजूस ओम मसाल्याचे दुकानाजवळ छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)उत्तम मधुकर हारकर, वय 46 वर्षे, रा. कसबा पेठ, ता. कळंब जि. धाराशिव, 2) अनिरुध्द मधुकर महामुनी,वय 47 वषे्र, रा. कल्पनानगर, कहंब जि धाराशिव, 3) सचिन लक्ष्मणराव हारकर, वय 43 वर्षे, रा. दत्तनगर कहंब ता. कळंब जि. धाराशिव हे 15.05 वा. सु. सोनार लाईन जाणारे रोडच्या बाजूस ओम मसाल्याचे दुकानाजवळ तिरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,700 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि.12.12.2023 रोजी 14.30 वा. सु. नळदुर्ग पो. ठा. हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)अमीर महेबुब उडचणे, वय 28 वर्षे, रा. रहिमनगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 14.30 वा. सु. नळदुर्ग बस स्टून्डचे बाजूला अक्कलकोट रोडवर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 3,050 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 2)माजीद अरेफ कुरेशी, वय 41 वर्षे, रा. इंदीरानगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 13.30 वा. सु. नळदुर्ग बस स्टून्डचे बाजूला अक्कलकोट रोडवर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,600 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“ मारहाण.”
उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)आदित्य कांबळे, 2)असिफ पठाण, 3) विशाल अंधारे, 4) दिग्विजय कांबळे रा. औटी प्लॉट उमरगा डिग्गी रोड उमरगा जि. धाराशिव, यांनी दि. 12.12.2023 रोजी सकाळी 00.30 वा. सु. औटी प्लॉट उमरगा डिग्गी रोड उमरगा जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे-संदीप कुंडलिक माने, वय 19 वर्षे, रा. एंकोडी रोड उमरगा जि. धाराशिव, यांना नमुद आरोपींनी तुझा भाउ भांडण सोडवायला का आला या कराणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीच्या दांड्याने डोक्यात मारुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे आई, आजी व वडील हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन लाकडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- संदीप माने यांनी दि.12.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) पाशा सय्यद,2) सलमा सय्यद(पुर्ण नाव माहित नाही) रा. धारासुर मर्दीनी कमानी समोर धाराशिव ता. जि. धाराशिव, यांनी दि.11.12.2023 रोजी 21.00 वा. सु. धारासुर मर्दीनी कमानी समोर धाराशिव येथे फिर्यादी नामे- अमिर अयुब सय्यद, वय 27 वर्षे, रा. तुळजापूर नाका ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी फिर्यादी हे त्यांचे पत्नीचे वाढदिवसा करीता आले असता काही एक कारण नसताना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- अमिर सय्यद यांनी दि.12.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504,34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)रमेश रामचंद्र सोनटक्के, 2)औंकार रमेश सोनटक्के, 3) ओंकार याचा मेहुणा बबलु (पुर्ण नाव माहित नाही),रा. जळकोट, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.11.12.2023 रोजी 11.30 ते 12.00 वा. सु. शेत गट नं 41 मध्ये जळकोट शिवारात ता. तुळजापुर जि. धाराशिव फिर्यादी नामे-रोहीत राम कदम वय 34 वर्षे, रा. जळकोट, ता. तुळजापूर जि. धाराशिव, यांना नमुद आरोपींनी तु प्रकाश सोनटक्के यांचे प्लॉटिंग चे काम का बगतो या कराणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, दगडाने डोक्यात डाव्या बाजूस मारुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- रोहीत कदम यांनी दि.12.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 326, 323, 504, 506, 34, 427 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-संदीप राधाकृष्ण जाधव, वय 44 वर्षे, रा. घाटे हॉस्पीटलचे पाठीमागे पुर्व मंगळवार पेठ तुळजापूर ता. तुळजापुर जि. धाराशिव यांचा भाउ सचिन जाधव यांचे जागेतील बांधकामातील ॲटेज संडास बाथरुम मध्ये बसवलेले दोन मॅट्रो प्लश, दोन डायवटर, दोन बेसींग मिक्सर असा एकुण 19,200₹ किंमतीचा माल हा दि. 11.12.2023 रोजी 00.30 वा. सु. फिर्यादी राहत असलेल्या बांधकाम तुळजापूर येथुन आरोपी नामे- आब्बास शमशोद्दीन नदाफ, रा. पापनास नगर तुळजापुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी पाईप कापून पाईपचे नुकसान करुन चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- संदीप जाधव यांनी दि.12.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 457, 380 427 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-नशीम नवाब शेख, वय 54 वर्षे, रा. मेन रोड मदीना चौक कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची एचएफ डिलक्स कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25ए.एच. 1943 चेसी नं- MDLHAR2321H5G00970 व इंजिन नं- HAMEnh5 G01347 ही दि.03.12.2023 रोजी 23.00 ते दि. 04.12.2023 रोजी 06.00 वा. सु. मेन रोड मदीना चौक कळंब येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नशीम शेख यांनी दि.12.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-सत्यवान वामन नन्नवरे, वय 45 वर्षे, रा. हंगरगा तुळ, ता. तुळजापुर जि. धाराशिव यांच्या दोन मोटरसायकल 1)एच.एफ. डिलक्स कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 ए. व्ही. 9303 चेसी नं- MBLHAW146N5A06516 व इंजिन नं- HA11ESN5A50164, 2) पल्सर कंपनीची मोटरसायकल क्र एम.एच. 25 ए.एक्स. 2554 अशा एकुण 60,000 ₹ किंमतीच्या दोन मोटरसायकल या दि.07.12.2023 रोजी 02.00 ते 05.00 वा. सु. सत्यवान नन्नवरे यांचे शेतातील शेडसमोरुन हंगरगा तुळ येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सत्यवान नन्नवरे यांनी दि.12.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-जयराम कोंडीबा मैंदाड, वय 32 वर्षे, रा. चोराखळी ता. कळंब जि. धाराशिव यांचे चोराखळी पाटी येथील रसवंती गृह पत्रयाचे शेड मधील अंदाजे 10,000₹ किंमतीचे साहित्य ज्यामध्ये उसाचा चरखा, इंजिन, तिस खुर्च्या, पाच टेबल असे दि.01.12.2023 रोजी 21.00 ते दि.02.12.2023 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जयराम मैंदाड यांनी दि.12.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी