धाराशिव (जिमाका)-जागतिक कौशल्य स्पर्धा ही दर दोन वर्षानी आयोजित केली जाते.ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्ठता स्पर्धा आहे.या स्पर्धेत जगभरातील 23 वर्षाखालील तरूणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही ऑलिम्पिक खेळासारखी संधी आहे.सन 2024 ची जागतिक कौशल्य स्पर्धा फ्रांस (ल्योन) येथे होणार आहे.
स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्राशी संबंधित जिल्हा आणि राज्य स्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,सेक्टर स्किल कॉन्सिल,विविध औद्योगिक आस्थापनांना यांच्या सहकार्याने कौशल्य सौर आयोजित करण्यात आली आहे.
कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाईन नाव नोंदणी 20 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
अंतिम दिनांकापूर्वी https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन स्पर्धेकरिता इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून स्पर्धेत सहभाग नोंदवावा. त्यानुसार स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग,राज्य व देशपातळीवर करून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आला आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2002 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.
तसेच Additive Manufacturing,Cloud computing,Cyber security, Digital Construction, Industrial Design Technology,Industry 4.0,Information Network Gabling,Mechatronics, Robot system Integration & Water Technology या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म 01 जानेवारी 1999 किंवा त्यानंतरचा असावा.
सर्व शासकीय आणि खाजगी आयटीआय,पॉलेटेक्निक, इंजिनिअरींग,कौशल्य संस्था, व्यावसायिक प्रशिक्षण संस्था, महाविद्यालये,कॉर्पोरेट टेक्नीकल इन्स्टीटुयट आणि संबंधित सर्व संस्थांमधून शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांनी Skill Competition मध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावी.असे आवाहन सहायक आयुक्त,कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केली.
More Stories
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन