August 9, 2025

127 दिव्यांगानी घेतला जयपूर फूट चा लाभ

  • रत्नागिरी – दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी रोटरी क्लब ऑफ कळंब शहर व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब येथे मोफत जयपुर फुट (कृत्रिम पाय आणि हात बसविणे) या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी मुंबई येथून श्रीम.नंदिनी ठक्कर ,मनोज ओमप्रकाश ,राम साकेत ,राजेश माने व रविंद्र शिंदे (सहाय्यक) यांची टीम आली होती.या टीमने सकाळीं 9 ते 5:30 वाजेपर्यंत 157 दिव्यांगांची तपासणी केली.यापैकी 61 दिव्यांगांच्या हात व पायाचे मोजमाप घेतले.त्यांना जयपूर फुट (कृत्रिम हात व पाय) मिळणार आहेत.तर 66 दिव्यांगांना सहाय्यक उपकरण याचा लाभ मिळणार आहे.
    हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कळंब शहराचे प्रोजेक्टर चेअरमन प्रा.संजय घुले, को.प्रोजेक्टर चेअरमन डॉ.गिरीश कुलकर्णी ,रोटरी क्लबचे अध्यक्ष सुदर्शन नारकर व सचिव डॉ.साजेद चाऊस तसेच डॉ.अभिजीत जाधवर, सतीश मांडवकर, डॉ. सुयोग कुलकर्णी, दत्तात्रय टोणगे, सचिन पवार,अशोक काटे, विश्वजीत ठोंबरे, या सर्वांनी परिश्रम घेतले तर प्रा.नामदेव तोडकर,प्रा.पंडित शिंदे, प्रा.विनायक मिटकरी , जयसिंग चौधरी, संजय शेंडगे,दत्तात्रय गायकवाड , मुरलीधर चोंदे व दत्तात्रय कांबळे यांनी सहकार्य केले.
    रोटरी क्लब ऑफ कळंब शहर यांनी समाजातील दुर्लक्षित राहिलेला घटक.खऱ्या अर्थाने ज्यांना जीवन जगण्यासाठी हाता व पायांची गरज असते. ज्यांना स्वतःचा उदरनिर्वाह ही भागविणे शक्य नाही.अशी दिव्यांग माणसे हजारो रुपये कसे खर्च करतील. पण ही संधी दिव्यांग व्यक्तींना या शिबिराच्या रूपाने मिळाली.व पंखरुपी बळ देण्याचे व आनंद देण्याचे कार्य या सर्वांनी केले. अशी संवेदना जाणणारी माणसे समाजात आहेत म्हणूनच दिव्यांग असणारी माणसे काही अंशी समाजामध्ये मान सन्मानाने जगत आहेत.स्तुत्य अशा उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शाखा कळंबचे तालुका अध्यक्ष भंडारे बी.एन.व तालुका सचिव अमोल बाभळे यांनी जयपुर फूटच्या सर्व टीमचा , रोटरी क्लबच्या सर्व पदाधिकारी व या कार्यास सहकार्य करणाऱ्या सर्व बांधवांचा शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
error: Content is protected !!