August 9, 2025

न.प.चे नियोजन खिशात,भाजी-पाला घेणाऱ्याचा जीव मुठीत..!

  • कळंब (महेश फाटक यांजकडून ) – येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या रस्त्यावर प्रत्येक रविवारी भाजी-पाला बाजार भरतो.पूर्वी जुने पोलीस स्टेशन,देवी रस्त्यावर हा बाजार भरला जात होता.
  • परंतु वरचेवर हा बाजार जुने पोलीस स्टेशन ते बार्शी रोड पर्यंत भरत असल्याने महाविद्यालयाकडे भोगजीकडे जाणाऱ्या वाहनामुळे फळे-भाजी घेणाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. आम जनतेच्या या समस्याकडे लक्ष देण्यास न.प ला वेळ नसून सर्व कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. प्रत्येक भाजी-पाला विक्रेत्याकडून १० रु.२० रु. वसूली मात्र कटाक्षाने केली जाते. मात्र भाजीपाला खरेदी करणाराना वाहनांच्या रहदारीमुळे जीव मुठीत धरून चालावे लागते. रोडच्या एका बाजूला क्रीडांगणाचे मैदान तर दुसऱ्या बाजूला न. प.शाळेचे मोठे मैदान खुले असते. परंतु न.प.चे नियोजन खिशात असल्याने भाजी-पाला खरेदी करणाऱ्यांचा जीव मुठीत..! असा प्रकार सुरू असून याकडे न.प. प्रशासन लक्ष केव्हा घालणार? अशी चर्चा सर्वसामान्यातून ऐकावयास मिळत आहे.
error: Content is protected !!