August 9, 2025

व्यवस्था माणसाला आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्यास भाग पाडते – विश्वनाथ अण्णा तोडकर

  • कळंब – व्यवस्था माणसाला आपली ताकद लावण्यात मजबूर करते म्हणजेच आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्यास भाग पाडते.अन्यायच्या विरोधात काम करणाऱ्या महिला आणि त्यांच्या जोडीदारास तेवढ्याच ताकदीने खांद्याला खांदा लावून पाठबळ देणाऱ्या महिलांचा सन्मान जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र लोक विकास मंचच्या वतीने करण्यात आला असल्याचे हृदयस्पर्शी उद्गार राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (आण्णा) तोडकर यांनी काढले.
    महाराष्ट्र लोकविकास मंचच्या वतीने कर्तत्वान महिलांचा पुरस्कार वितरण समारंभ दि. १० डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १.०० वाजता पर्याय संस्थेच्या सभागृहात विश्वनाथ (आण्णा) तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आपल्या भाषणात पुढे बोलताना विश्वनाथ (आण्णा) तोडकर यांनी कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की,अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या तसेच विधवा, परितक्त्या व एकल महिलांसाठी पंचायत राज सत्तेत त्यांना अधिकार व न्याय मिळवून देणाऱ्या महिला कार्यकर्त्यांचा हा सन्मान करण्यात येत असून सर्व पुरस्कार महिलांसाठीच देण्यात आले असल्याचे नमूद केले.

  • या कार्यक्रमात एम.एन.
  • कोंढाळकर राष्ट्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र लोक विकास मंच, मंगलाताई दैठणकर सामाजिक कार्यकर्त्या पुणे ,रमाकांत कुलकर्णी राष्ट्रीय संघटक, भूमिपुत्र वाघ राष्ट्रीय उपाध्यक्ष ,मनीषा घुले खजिनदार, बंडू आंबटकर विदर्भाध्यक्ष,अरुण जाधव पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ,ओमप्रकाश गिरी मराठवाडा अध्यक्ष, पुष्कराज तायडे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आदींनी आपल्या प्रमुख उपस्थितीत मनोगते व्यक्त केली. पुरस्कार प्राप्त महिलांच्या कार्यावर भूमिपुत्र वाघ यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला.

  • कार्यक्रमाच्या दिवशी सकाळीच पुरस्कार प्राप्त महिला, विश्वनाथ तोडकर, भूमिपुत्र वाघ,सुभाष घोडके,माधवसिंग राजपूत,एम.एन.कोंढाळकर, शाहीर बंडू खराडे सह प्रमुख पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
    कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या सन्मान सोहळ्यात पुणे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व महिला राजसत्ता आंदोलनाच्या प्रवक्त्या मंगलताई दैठणकर यांना जीवनगौरव पुरस्कार,द्वारका पवार अहमदनगर,लिलावती चव्हाण हिंगोली,विद्याताई वाघ धाराशिव,अनिता तोडकर छत्रपती संभाजी नगर,कालिंदी पाटील पुणे ,उषावर्ता बेळे लातूर, पंचफुला बिराजदार नांदेड, विजया मधुकर धस यवतमाळ, शबाना शेख सांगली, मेघनाताई कुलकर्णी पुणे,सत्वशीला घुले बीड, सुशीला ताई पाईकराव हिंगोली,संध्याताई बारगजे बीड, मंगलाताई भिसे बीड,नर्मदा जोगदंड परभणी,आदिना कर्मयोगी कार्य गौरव व समाज कार्यातील गौरव स्तंभ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या सन्मानाचे स्वरूप सन्मानपत्र,स्मृतीचिन्ह पुष्पहार ,फेटा असे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री तोडकर यांनी केले. प्रस्तावना मनीषा घुले यांनी तर आभार ओमप्रकाश गिरी यांनी मानले.

  • राष्ट्रगीतांनी या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे प्रकाश भडंगे, अँड.त्रिंबकराव मनगिरे,विलास करंजकर,प्रा.संजय घुले,सुफी सय्यद,सुभाष घोडके,रमेश आंबीरकर,संदीप कोकाटे, मााधवसिंग राजपूत यांची उपस्थिती होती.
    कार्यक्रमात शाहीर बंडू खराडे यांच्या टिमचा शाहिरीचा कार्यक्रम सादर झाला.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्याय सामाजिक संस्थेचे विलास गोडगे ,सुनंदा खराटे,अश्रुबा गायकवाड,भिकाजी जाधव, विकास कुदळे,बालाजी शेंडगे,वैभव चोंदे,अश्रुबा गायकवाड,रियाज शेख,अतुल चिलवंत यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!