- नांदेड (जिमाका) – सामाजिक सुरक्षितता व साक्षरतेसाठी सोशल मिडिया अर्थात समाज माध्यमांचा अत्यंत प्रभावी उपयोग अनेक व्यक्ती करीत आहेत. इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्यूब, ब्लॉग आदी माध्यमांचा प्रभावी उपयोग करणाऱ्या युवक-नागरिक यांच्यासमवेत मतदान जनजागृतीसाठी चर्चा करता यावी व यात युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेता यावा या उद्देशाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत संवाद साधणार आहेत. दिनांक 8 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात हा संवाद दुपारी 5 वा. होईल.
नांदेड शहरातील जे व्यक्ती राजकीय पक्षांसमवेत निगडीत नाहीत अथावा जे युवा, नागरिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी नाहीत अशा युवकांनी-नागरिकांनी या विधायक उपक्रमासाठी मुक्त संवादात सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात