नांदेड (जिमाका) – “मानवी हक्क दिन” येत्या 10 डिसेंबर रोजी साजरा करण्याचे निर्देश राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव डी. बी. गावडे यांनी दिले आहेत. संरक्षण कायदा 1993 मधील कलम 12 अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करणे हा राज्य मानवी हक्क आयोगाचा महत्वपूर्ण अविभाज्य भाग आहे. समाजातील तळागाळापर्यत जनतेला मानवी हक्काची माहिती पोहोचावी या उद्देशाने व्याख्याने, भाषणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे निर्देश सर्व कार्यालय प्रमुखांना जिल्हा प्रशासनानी दिले आहेत.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात