कळंब – कळंब–लातूर रस्त्यावरील अपूर्ण आणि निकृष्ट कामांमुळे आतापर्यंत अनेक निरपराध नागरिकांचा जीव गेला असून, स्थानिक नागरिकांसह शिवसेना (उबाठा गट) आक्रमक झाली आहे. याप्रकरणी तहसीलदारांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना न झाल्यास रस्ता रोकोसह तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले असून, खडकीजवळील अरुंद पुलावर झालेल्या अपघातात प्रकाश महाजन व मंगेश महाजन या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. यानंतर आमदार कैलास घाडगे पाटील यांनी १० मे २०२५ रोजी पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून संबंधित अभियंता व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तरीसुद्धा अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. यानंतर करंजकल्ला गावाजवळील अरुंद वळणावर,चेतावणी फलक नसल्यामुळे तरुण व्यापारी कै. रमेश होनराव यांचा मृत्यू झाला. तसेच डिकसळ पाटी,त्रिवेदी कॉम्प्लेक्स,छत्रपती संभाजीराजे चौक येथे गतिरोधक नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर तालुका प्रमुख सचिन काळे,माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, प्रा. डॉ. संजय कांबळे, प्रदीप मेटे, शहर प्रमुख विश्वजीत जाधव, युवासेना तालुका प्रमुख पंडित देशमुख, उपशहर प्रमुख निर्भय घुले, शाम खबाले, संतोष लांडगे, प्रा. दिलीप पाटील, गोविंद जोगदंड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तालुका व्यापारी महासंघाचाही इशारा – रक्षाबंधनपूर्वी उपाययोजना करा तालुका व्यापारी महासंघ, कळंब यांनीही रक्षाबंधनपूर्वी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत प्रशासनास इशारा दिला आहे. मागण्या – करंजकल्ला वळणावर स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक व दिव्यांची तातडीने व्यवस्था वळणाची रचना बदलून सुरक्षित वळणाची निर्मिती,भविष्यातील अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना,“रक्षाबंधनासारख्या सणासुदीच्या काळात आणखी एखाद्या बहिणीचा भाऊ या मृत्यूमार्गावर गमवावा लागू नये,” असा भावनिक सूर निवेदनात आहे. मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास व्यापारी व नागरिकांच्या वतीने मोर्चा व तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष नंदकिशोर मोरे,शहराध्यक्ष मयूर रुणवाल,तालुका सचिव बालाजी बावळे यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले