कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद संलग्न छत्रपती शिवाजी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय,कळंब तसेच रासेयो व आयक्युएसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि.१ ऑगस्ट २०२५,शुक्रवार रोजी लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.शशिकांत जाधवर हे होते.प्रमुख वक्ते म्हणून प्रा.सोमनाथ कसबे,प्रा.राजाभाऊ चोरघडे व प्रा.अमोल शिंगटे यांनी उपस्थित राहून डॉ.अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी प्रा.सोमनाथ कसबे यांनी या महामानवांच्या कार्याविषयी सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.शशिकांत जाधवर यांनी केले. प्रास्ताविक प्रा.राजाभाऊ चोरघडे, सूत्रसंचालन प्रा.अमोल शिंगटे,तर प्रा.विजय घोळवे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास रासेयो विभाग प्रमुख सौ.मनीषा कळसकर,प्रा.अभिमान ढाणे,आयक्युएसी समन्वयक डॉ.अनिल जगताप,तसेच महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले