August 8, 2025

हरीत धाराशिव अभियान १९ जुलै रोजी उद्घाटन समारंभ

  • धाराशिव (जिमाका)- जिल्ह्याचे वनाच्छादित क्षेत्र वाढावे व पर्यावरण संतुलन राखले जावे यासाठी १९ जुलै रोजी जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून करण्यात येणाऱ्या हरित धाराशिव अभियानाचे उद्घाटन सकाळी १०:३० वाजता राखीव वन शिंगोली ता.धाराशिव येथे करण्यात येणार आहे
    १९ जुलै २०२५ रोजी जिल्ह्यात १५ लक्ष वृक्ष लागवड करून एक नवा विक्रम करण्यात येणार आहे.हरित धाराशिव अभियानाचे उद्घाटन परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.यावेळी मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री सतीश चव्हाण,विक्रम काळे,कैलास घाडगे पाटील,प्रा.डॉ.तानाजी सावंत व प्रवीण स्वामी यांची प्रमुख उपस्थिती तर अभिनेता स्वप्निल जोशी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
    नागरिकांनी हरित धाराशिव अभियानाच्या उद्घाटन समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीण धरमकर,सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी व्ही.के.करे व विभागीय वन अधिकारी बी.ए.पोळ यांनी केले आहे.
error: Content is protected !!