August 10, 2025

खाजगी वजन काट्यावर वजन करण्याच्या ठरावाला येडेश्वरी साखर कारखान्याची परवानगी !

  • केज – केज तालुक्यातील बनसारोळा या ठिकाणी शेतकरी नेते अच्युत बापू गंगणे, भाई मोहन गुंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी दि.१९ नोव्हेंबर २०२३ रोजी ऊस व्यवसाय उद्योजक परिषद बनसारोळा या ठिकाणी घेतली, या परिषदेमध्ये ऊस उत्पादनाच्या अनेक बाबींवर अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात आली, त्यामध्ये अनेक ऊस उत्पादक शेतकरी हिताचे ठराव घेण्यात आले, त्यापैकीच सर्वात महत्त्वाचा असणारा ठराव त्या ठिकाणी असलेले ऊस उत्पादक शेतकरी किशोर तात्या थोरात यांनी उसाच्या वजनाविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. तो दूर करण्यासाठी, कारखान्याच्या वजना अगोदर शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनाची खातरजमा करण्यासाठी खाजगी वजन काट्यावर वजन करण्याची मुभा द्यावी असा ठराव सुचविला. त्या ठरावाला सर्व शेतकऱ्यांनी एकमताने पाठींबा दिला.
    या ठरावाची नोंद घेत केज तालुक्यातील शेतकरी पुत्र असलेले येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन यांनी २४ तासाच्या आत सहमती देत त्या ठरावाचे स्वागतही केले. व या ठरावाला आमची मान्यता आहे, असे स्पष्ट सागितले, त्यामुळे येडेश्वरी कारखाना हा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आहे. हे पुन्हा आणखी
    एकदा दाखवून दिले. त्यामुळे येडेश्वरी कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांनी कारखान्याने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करून अभिनंदन केले.या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर होऊन कारखाना व शेतकरी यांच्यामधील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे.
error: Content is protected !!