कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या शिक्षणविषयक स्वप्नपूर्तीसाठी कळंब शहरातून प्रकाशित होणाऱ्या सा.साक्षी पावनज्योत या वृत्तपत्राचे मार्गदर्शक तथा ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळ्याचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोक मोहेकर यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित विशेषांक दिनांक ११ जून २०२५ रोजी सप्रेम भेट म्हणून सुपूर्द करण्यात आला. हा विशेषांक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), धाराशिव येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.उमेश नरवडे,अधिव्याख्याता डॉ.शरीफ शेख तसेच भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांना सा.साक्षी पावनज्योतचे कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी जयचंद्र रणदिवे,दिनकर साबळे,हनुमंत कांबळे,गट साधन केंद्राचे विषय साधन व्यक्ती श्रीमंत शिंदे,अनंत तिडके आणि सुलतान शेख आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
गाजलेले प्रवचनकार ह.भ.प नाना चव्हाण महाराज रुईभर व धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध ऑडिटर अनिल पाटील यांना दि.१२ जून २०२५ रोजी बहुजनांच्या न्याय हक्कासाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेले सा. साक्षी पावन यांचा डॉ.अशोकराव मोहेकर वाढदिवस विशेषांक संपादक सुभाष द.घोडके यांच्या हस्ते सप्रेम भेट देण्यात आला.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला