August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि. 14 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 113 कारवाया करुन 68,550 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.14.11.2023 रोजी 19.30 वा. सु. उमरगा पो. ठा. बिरुदेव मंदीराच्या पाठीमागे उमरगा येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)दत्तात्रय नागोराव जमादार, वय 31 वर्षे, रा.शासकीय झोपडपट्टी, उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव, हे बिरुदेव मंदीराच्या पाठीमागे उमरगा येथे सुरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,010 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • ढोकी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- गणेश काशिनाथ नाडे, वय 43 वर्षे, रा.मुरुड ता.जि. लातुर यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्र एमएच 24 एएन 2834 ही दि. 06.11.2023 रोजी 09.00 ते 13.00 वा. सु. तेरणा साखर कारखाना पार्कींग मधून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी- गणेश नाडे यांनी दि.14.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-लतीफ बब्रु शेख, वय 48 वर्षे, रा. खानापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे घरासमोर बांधलेले दोन गायी, एक खोंड, एक म्हैस असा एकुण 85, 000₹ किंमतीचे जणावरे हे दि. 12.11.2023 रोजी 20.00 ते दि. 13.11.2023 रोजी 04.00 वा. सु. लतीफ शेख यांचे घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी- लतीफ शेख यांनी दि.14.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)काका साहेब देविदास गायकवाड, 2)लखन संजय गायकवाड, 3)रोहन उर्फ रोहीत राजु गायकवाड, 4) प्रकाश रामचंद्र गायकवाड, 5) भरत विलास गायकवाड, 6) राजु दिगंबर गायकवाड, 7) भैरुबा तानाजी फुकटे, 8) शाम प्रभाकर गायकवाड, सर्व रा. माडज, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.12.11.2023 रोजी 20.00 वा. सु. माड गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुंदर टेलरिंग उर्फ आर के टेलरिंग दुकानात ता. उमरगा येथे फिर्यादी नामे- प्राण उर्फ खंडु ज्ञानोबा काळे, वय 40 वर्षे, रा. माडज, ता. उमरगा जि. धाराशिव यांना तुझा भाउ शरद काळे यास आमच्यावर केस करण्यास का सागिंतले असे म्हणून नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस जिवे मारण्याच्या उद्देशाने हातातील कत्तीने, लोखंडी रॉड व काठीने डोक्यात, उजवे हातावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच नमुद आरोपींनी फिर्यादीचा मावस भाउ शिवराम सिताराम फुकटे यांचे धरात घुसून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने काठृयाने मारुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- प्राण उर्फ खंडु ज्ञानोबा काळे यांनी दि.14.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 307, 326, 452, 323, 504, 143, 147,148, 149 भा.दं.वि.सं. सह मपोका कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)किरण महादेव लगदिवे, 2) ओमकार महादेव लगदिवे दोघे रा. शेकापूर ता. जि. धाराशिव यांनी दि.13.11.2023 रोजी 15.30 वा. सु. अमर पॅलेस बेंबळी कॉर्नर धाराशिव येथे फिर्यादी नामे- अजय तानाजी फरताडे, वय 29 वर्षे, रा. यज्ञ नारायण कॉलनी, ओमनगर जवळ जि. धाराशिव यांना आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन नमुद आरोपीनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकूने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांचे गळ्यातील 30 ग्रॅम वजनाची चैन सदर भांडणामध्ये हिसकावून घेतली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- अजय फरताडे यांनी दि.14.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 327, 324, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) अजय तानाजी फरताडे, वय 29 वर्षे, रा. यज्ञ नारायण कॉलनी, ओमनगर जवळ जि. धाराशिव यांनी दि.13.11.2023 रोजी 15.30 वा. सु. अमर पॅलेस बेंबळी कॉर्नर धाराशिव येथे फिर्यादी नामे-ओमकार महादेव लगदिवे रा. शेकापूर ता. जि. धाराशिव यांना आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन नमुद आरोपीनी फिर्यादीस शिवीगाळ करुन चाकूने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा भाउ किरण लगदिवे हा भांडण सोडवण्यास आला असता त्यासही नमुद आरोपीने शिवीगाळ करुन चाकुने चेहऱ्यावर वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- ओमकार लगदिवे यांनी दि.14.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 324, 504 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)बच्चन कल्लापा ढाले, रा. किलन ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 13.11.2023 रोजी 19.30 वा. सु. समाज मंदीर भिमनगर किलज येथे फिर्यादी नामे- प्रकाश चिंतामणी कांबळे, वय 32 वर्षे, रा. भिमनगर किलज ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना तु आमचे घराकडे का बघतो या कारणावरुन नमुद आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करुन दगडाने डोक्यावर मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- प्रकाश कांबळे यांनी दि.14.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 324, 504 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!