August 8, 2025

प्रशांत (बापू) गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

  • कळंब – एस.टी.आगारातील कास्ट्राईब संघटनेचे कोषाध्यक्ष,तसेच एक शांत,संयमी,प्रेमळ आणि मनमिळावू व्यक्तिमत्व असलेले प्रशांत (बापू) गायकवाड याच्या वाढदिवसानिमित्त दि.२५ एप्रिल २०२५ रोजी जिवलग मित्रांच्या वतीने अभिष्टचिंतन कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. प्रशांत गायकवाड हे केवळ संघटनेचे पदाधिकारी नसून,त्यांच्या स्वभावातील आपुलकी,संवादकौशल्य,आणि कधी गंमतीतून तर कधी गंभीरतेतून समोरच्याच्या मनात स्थान निर्माण करणारे असे एक वेगळेच व्यक्तिमत्व आहे.त्यांचा मित्रप्रेमी स्वभाव,सुखदुःखात दिलासा देणारा,आणि मदतीस नेहमी तयार असलेला हात मित्रांना सतत आधार देतो.
    या खास दिवशी मित्रमंडळींनी त्यांच्याबद्दलच्या भावना,प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करत कार्यक्रमाचे स्वरूप अधिकच विशेष केले.शुभेच्छांचा वर्षाव, भोजन आणि हास्यविनोद यामुळे वाढदिवसाचा हा क्षण संस्मरणीय ठरला.
    या निमित्ताने त्यांच्या पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देत,त्यांनी यापुढेही असेच समाजासाठी आणि मित्रपरिवारासाठी प्रेरणादायी कार्य करत राहावे,हीच अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
    याप्रसंगी सुरजराव गायकवाड,अजित हौसलमल,प्रशांत हौसलमल,सागर उबाळे,सागर पट्टेकर,अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!