August 9, 2025

चितेगाव शाळेत दीपोत्सव उत्साहात साजरा

  • संभाजी नगर – विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाश निर्माण करणाऱ्या ज्ञानमंदिरात जि.प.कें.प्रा.शा.चितेगाव शाळेत दिवाळी सणानिमित्त शेकडो दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने शालेय इमारत उजळून निघाली.या शाळेतील विद्यार्थ्याना प्रमिथ फाऊंडेशनच्या ग्रीन एज्युकेशन मूव्हमेंट इन स्कूल प्रकल्प अंतर्गत पणत्यां देण्यात आल्या होत्या. या पणत्यांना मुलांनी रंग देऊन खुप आकर्षक बनविले होते. याच पणत्यांचा दीपोत्सव केंद्रीय मुख्याध्यापक पंडित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. हा दीपोत्सव महाराष्ट्रातील जि.प.प्राथमिक शाळेतील अनोखा उपक्रम म्हणता येईल या उपक्रमासाठी विशेष सहकार्य प्रमिथ फाऊंडेशनच्या अर्चना शिर्के, ज्ञानेश्वर हावळे,बाळासाहेब पिसाळ, उद्धव गाबूड यांनी केले व दीपोत्सव साठी सहशिक्षक महेश लबडे तसेच शाळेचे शापोआ कर्मचारी व विद्यार्थी उत्साहाने उपस्थित होते.
error: Content is protected !!