August 9, 2025

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी नव्या निर्वाचन अधिकाऱ्याची नियुक्ती

  • धाराशिव (जिमाका) — महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.सर्वोच्च न्यायालयाने SLP क्रमांक ८५७६/२०२५ या याचिकेच्या अनुषंगाने दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार,विद्यमान निर्वाचन अधिकाऱ्यांऐवजी नवीन निर्वाचन अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती केल्यास निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू ठेवता येईल,असे निर्देश दिले होते.
    या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सुनिलकुमार धोंडे,अवर सचिव,वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग,मंत्रालय,मुंबई यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी नवीन निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
    महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसारच गुरुवार,दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी पार पडणार आहे.मतदान सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होईल.
    सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी या निवडणुकीत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
error: Content is protected !!