August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि. 09 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 81 कारवाया करुन 62,000 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • कळंब पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.09.11.2023 रोजी 21.10 वा. सु. कळंब पो. ठा. होळकर चौक कळंब येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)मतीन दस्तगीर मंडे, वय 42 वर्षे, रा.इंदीरानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव, 2) अरबाज निजाम शेख, वय 21 वर्षे, रा.इंदीरानगर कळंब जि. धाराशिव हे दोघे होळकर चौक कळंब येथे मिलन मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,627 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) अभिषेक बालाजी वाळके, वय 24 वर्षे, रा. एकंबीवाडी, ता. औसा जि. लातुर हे दि.09.11.2023 रोजी 17.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मारुती स्वीप्ट डिझायर क्र एमएच 25 ए.एल. 4456 ही तामलवाडी टोलनाका जवळील सोलापूर तुळजापूर रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • उमरगा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- मधुकर तुकाराम घोडके, वय 60 वर्षे, रा. महादेव मंदीराजवळ उमरगा, ता. उमरगा जि. धाराशिव यांचे उमरगा शिवारातील शेत गट नं 361/2 मधील सीआरआय कंपनीची पानबुडी मोटार व सीआरआय कपंनीचा वायर असा एकुण 18,000₹ किंमतीचा माल हा दि. 08.11.2023 रोजी 17.00 ते 21.00 वा. सु. आरोपी नामे 1) अमोल अशोक सुरवसे, 2) बालाजी श्रीपती पुरके, 3) बाजीराव मच्छिंद्र सोनटक्के, 4)संगीता बालाजी पुरके, 5) उज्वला बाजीराव सोनटक्के सर्व रा. बिरुदेव मंदीराचे पाठीमागे उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- मधुकर घोडके यांनी दि.09.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- सुरेश ज्ञानदेव नाईकवाडी, वय 60 वर्षे, रा. कौडगाव, ता. जि. जि. धाराशिव यांची अंदाजे 14,000 ₹ किंमतीची पानबुडी मोटार 5 एच पी ही दि. 07.11.2023 रोजी 21.00 ते 08.11.2023 रोजी 08.00 वा. सु कौडगाव शिवारातील शेता शेजारील नदीतुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुरेश नाईकवाडी यांनी दि.09.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • भुम पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)महारुद्री भास्करकाळे, 2)भास्कर निव.त्ती काळे, 3) मनिषा महारुद्र काळे, 4) उर्मिला युवराज काळे, 5) युवराज अजिनाथ काळे, 6) रणजित अजिनाथ काळे, 7) भरत कल्याण काळे, 8) बापू बाजीराव देवकर, 9) महेश बापू देवकर, 10) प्रविण युवराज काळे रा. भोगलगाव ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.03.11.2023 रोजी 16.15 वा. सु. भोगलगाव शिवारातील शेत गट नं 73 मध्ये फिर्यादी नामे- आलिशा बाबु शेख, वय 45 वर्षे, रा रा. भोगलगाव ता. भुम जि. धाराशिव यांना शेत मोजणीच्या खुणावर चुना का टाकला या कारणावरुन नमुद आरोपीनी फिर्यादीस शिवीगाळ करुन रस्त्यात आडवून लाथाबुक्यांनी, मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांचे पती, मुलगा व पुतण्या हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी चाकु, काठीने व दगडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- आलिशा शेख यांनी दि.09.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 326, 324, 323, 341, 143, 147, 148, 149, 504 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) अनिल तारु राठोड, 2) सोमनाथ अर्जुन राठोड, 3) श्रीकांत गोविंद राठोड,4) श्रीनाथ गोंविद राठोड, 5) गोविंद चंदु राठोड, 6) आकाश पोमा पवार, 7) शांताबाई पोमा पवार, 8)आरुषा बाळू चव्हाण, 9) शंकर चंदु राठोड सर्व रा. आलियाबाद तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 06.11.2023 रोजी 11.00 वा. सु. आलीयाबाद तांडा ता. तुळजापूर येथे फिर्यादी नामे- सुनिल बिल्लु राठोड, वय 42 वर्षे रा. आलियाबाद तांडा, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयत्याने व काठीने उजव्या हाताचे करंगळीवर मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुनिल राठोड यांनी दि.09.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 324, 323, 143, 147, 148, 149, 504 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ रस्ता अपघात.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे : आरोपी नामे- शशीकांत लक्ष्मण कांबळे, वय 32 वर्षे रा. जुना बस डेपो धाराशिव व सोबत फिर्यादी नामे- राकेश भारत जाधव, वय 33 वर्षे, रा. गणपती मंदीर जवळ गणेश नगर धाराधिव ता. जि. धाराशिव हे दोघे दि 31.10.2023 रोजी 04.30 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 एएन 013 यावरुन बेंबळी रोडने मित्राचे बकऱ्याचे कार्यक्रमास जात होते. दरम्यान शशीकांत कांबळे यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून मोटरसायकल घसरुन पडल्याने या आपघातात मयत आरोपी नामे शाशीकांत कांबळे हे मयत झाले. तर. राकेश जाधव हे गंभीर जखमी झाले.अशा मजकुराच्या फिर्यादी राकेश जाधव यांनी दि.09.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338 304 (अ) सह मो. वा. कायदा कलम 184अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • कम्युनिटी पोलीसिंग अंतर्गत दिवाळी सणा निमित्त एक हात मदतीचा गरजवंतासाठी उपक्रमाचे आयोजन.”
  • कम्युनिटी पोलीसिंग अंतर्गत दिवाळी निमित्त एक हात मदतीचा गरजवंतासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन
  • करण्यात आले आहे. या उपक्रमात गोरगरीब कुटुंबाला फराळाचे साहित्य, मुलांसाठी कपडे, शैक्षणिक साहित्य तसेच जिवन आवश्यक वस्तू भेट स्वरुपात देण्यात येणार आहे. त्यासाठी समाजातील दानशुर व्यक्तींनी भेटवस्तु देवून या उपक्रमाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.
  • दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे या सणाचा आनंद अनेक गोरगरिब कुटुंबातील लोकांना मिळत नाही म्हणून त्यांना या सणाच्या आनंदात सहभागी करुन घेण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक हात मदतीचा गरजवंतासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या निमीत्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विविध पक्ष सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
  • या उपक्रमात दानशुर व्यक्तीने दिवाळी फराळाचे साहित्य, कपडे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, अथवा आपापल्या इच्छेनुसार गरजवंताला लागणारे साहित्य उपलब्ध करुन दयावे असे आवाहन यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून उपस्थित मान्यवरांनी मदत उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने गोरगरिबांची दिवाळी गोड होणार आहे.
  • या उपक्रमा अंतर्गत मदत करण्यास इच्छुक असलेल्या दानशुर व्यक्तींनी पोलीस कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सिध्देश्वर गोरे (9922000580), पोलीस नाईक गणेश शिंदे मोबाईल नं(9922217189) यांच्याशी संपर्क साधावा.
error: Content is protected !!