कळंब (महेश फाटक ) – नवोदय विद्यालय तुळजापूर प्रवेशासाठी निकालामध्ये कळंब शहरातील प्रातिनिधी स्वरूपामध्ये मित्र परिवाराच्या वतीने रणवीर राजेंद्र पवार,अक्षय बजरंग गिरी,यशराज परमेश्वर वाघमोडे,वैष्णवी प्रदीप यादव व नव्यानेच रुजू झालेले नायब तहसीलदार कळंबचे सुपुत्र गोकुळ भराडीया यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी कळंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग मगर, ह.भ.प.महादेव महाराज आडसूळ,अनिल यादव, दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी बालाजी आडसूळ,उद्योजक विठ्ठल माने,मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड,उपक्रमशील शिक्षक तथा उद्योजक महादेव खराटे, मुख्याध्यापक निशिकांत आडसूळ,शंकरराव (नाना करंजकर) धनंजय गव्हाणे, रमेश शिंदे , प्रा.सचिन बोंदर,युवा नेते पिनू जाधवर,यशवंत विद्यार्थ्यांचे पालक राजेंद्र पवार,बजरंग गिरी, परमेश्वर वाघमोडे,प्रदीप यादव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ह.भ.प महादेव महाराज आडसूळ यांनी गुणवंत विद्यार्थी व पालकांचे हार्दिक अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयोजक मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड,सूत्रसंचालन महादेव खराटे तर आभार प्रदर्शन राजेंद्र पवार यांनी केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले