कळंब – जागतिक वन दिनानिमित्त कळंब वनपरिक्षेत्र अधिकारी,सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कळंब वतीने तालुक्यातील धरणग्रस्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लोहटा (पूर्व),जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहटा (पूर्व),विद्याभवन हायस्कूल कळंब व आदर्श इंग्लिश स्कूल कळंब या ठिकाणी चित्रकला स्पर्धा,वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या निमित्त कळंब वनपरिक्षेत्र अधिकारी भालचंद्र तळेकर , तसेच वनपाल,तेलंगे,ढेंबरे , कुलकर्णी व वनरक्षक स्वामी , श्रीमती.आवारे,टोणगे,सर्व शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना वन विभागाने व वनविभागाने वनन विषयीया माहिती देण्यात आले व विद्यार्थ्यांना बक्षीस व खाऊवाटप करण्यात आला.यावेळी सर्व कर्मचारी व शिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर