August 8, 2025

अखंड शिवनाम सप्ताहाचा भव्य मिरवणुकेने सांगता

  • कळंब- शहरातील सराफ लाइन येथील संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या मंदिरात दिनांक २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधी मध्ये शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
    या सप्ताहात शि.म.प. राजाभाऊ महाराज खडबड, शि.म.प.रमेश हिरे (खडकी), शि.भ.प.जगन्नाथ महाराज क्षिरसागर (देवळाली),शि.भ.प. संगमेश्वर बिराजदार महाराज (वलांडी),शि.भ.प उमाकांत महाराज मिटकरी (चुंबळीकर), शि.भ.प सौ. किर्ती स्वामी महाराज (लातुर),शि.भ.प. विश्वनाथ स्वामी महाराज (पेनुरकर) यांचे किर्तन झाले.
    दिनांक १ फेब्रुवारी रोजी पापडे गल्ली येथील गणपती मंदिरात गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे.
    दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी ष.ब्र.प.पू. १०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज (मानूर) व ष. ब्र.प.पू.१०८ शंभुलिंग शिवाचार्य महाराज (अंबाजोगाई) यांच्या उपस्थितीत सकाळी भव्य कलश व परमरहस्य ग्रंथ मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्यादेवी होळकर चौक,मेन रोड,बागवान चौक येथून सराफ लाईन या मार्ग टाळ व मुद्रुग च्या गरजात भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे.या मिरवणुकीची सांगता संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिर येथे करण्यात आली आहे. यावेळी संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
    तद्नंतर शि.भ.प.सौ.सरस्वती स्वामी अंबाजोगाईकर यांच्या काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या सप्ताह मध्ये अनेक अन्यदात्यांनी अन्नदान केल्यामुळे यांचा श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
    दररोज परमरहस्य पारायण वाचन शि.भ.प राजाभाऊ खडबड महाराज यांनी पारायणाचे वाचन केले. शिवकथा शि.भ.प.सरस्वती स्वामी यांनी सांगितली
    यावेळी लिंगायत समाज भुषण पुरस्कार शिवानंद कथले,सतीश शिंगणापूरे व मंगल प्रकाश लोखंडे यांना प्रदान करण्यात आला आहे.
    सप्ताह यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समिती उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे,संत शिरोमणी मन्मथ स्वामी स्वामी सेवाभावी संस्थेचे सागर मुंडे, शिवाजी लोखंडे,शिशिर राजमाने,निलेश होनराव,नाना थळकरी,शितलकुमार घोंगडे,डॉ. सुनील थळकरी,कैलास बागल, विलास मिटकरी,नाना शिंगणापूरे,शिवकुमार राजमाने, समीर मुंडे,अभिषेक मुंडे,संकेत मुंडे,अथर्व मुंडे,सतीश शिंगणापूरे संजय मुंडे,किरण फल्ले,मनोज फल्ले,मच्छिंद्र साखरे यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!