- पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्भीडपणा आणि स्वाभिमान या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या मानल्या जातात. सुभाष घोडके हे या गुणांचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. आपल्या धारदार लेखणीतून सत्य आणि न्यायाची बाजू मांडणारे घोडके हे महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या क्षेत्रात एक मानाचं पान आहेत.सुभाष घोडके यांनी नेहमीच सत्य मांडण्याचा निर्धार केला आहे.शासनव्यवस्थेतील अनियमितता,भ्रष्टाचार,आणि समाजातील वाईट चालीरीतींवर त्यांनी परखडपणे बोट ठेवले आहे.त्यांची लेखनशैली थेट असून कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडणारी आहे. त्यांच्या पत्रकारितेमुळे अनेक लोकांना न्याय मिळाला आहे आणि प्रशासनालाही जबाबदारीची जाणीव झाली आहे.स्वाभिमानी पत्रकारिता म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या आर्थिक,राजकीय किंवा सामाजिक दबावाला न जुमानता आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे. सुभाष घोडके यांनी नेहमीच आपला स्वाभिमान टिकवून ठेवल्यामुळेच त्यांची लेखनशैली इतरांपेक्षा वेगळी ठरते.त्यांनी आपल्या कामातून समाजात परिवर्तन घडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.
सुभाष घोडके यांच्या निर्भीड पत्रकारितेमुळे अनेक समस्यांवर प्रकाश पडला आहे.त्यांनी फक्त बातम्या मांडल्या नाहीत तर त्यामागील सत्य शोधून ते जनतेसमोर मांडले आहे.त्यांचे अग्रलेख समाजाला जागृत करणारे ठरले आहेत.सुभाष घोडके यांची लेखनशैली ही स्पष्ट,प्रभावी आणि जळजळीत आहे.त्यांच्या शब्दांमध्ये केवळ आरोप नसतात तर सत्य उघड करण्याची ताकद असते.त्यांच्या लेखणीतून समाजाची उन्नती आणि न्यायव्यवस्थेतील सुधारणांची मागणी सतत दिसून येते.सुभाष घोडके यांची निर्भीड व स्वाभिमानी पत्रकारिता ही नव्या पिढीतील पत्रकारांसाठी आदर्श आहे.सत्य मांडण्याची ताकद आणि मूल्यांशी प्रामाणिक राहण्याचा धडा त्यांनी आपल्या कार्यातून दिला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मौजे पिंपळगाव (डोळा) येथील आठरा विश्व दारिद्रय पूजलेल्या स्मृतीशेष बगडाबाई व स्मृतीशेष दशरथ एकनाथ घोडके यांच्या पोटी दिनांक ९ जानेवारी १९६३ रोजी जन्म घेतलेले पत्रकार तथा लेखक सुभाष घोडके यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा मानाचा असलेला कै.सुधाकर सावळे साप्ताहिक पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.पत्रकार दिनानिमित्त १० जानेवारी २०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते सुभाष द.घोडके यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
११ जुलै १९८९ ला ढोकी रोड कळंब येथे आसरा स्टील इंडस्ट्रीजच्या माध्यमातून वेल्डिंगचा व्यवसाय सुरू केलेले सुभाष घोडके यांनी १९९४ पासून पत्रकारितेला सुरुवात केली. तुटलेल्या लोखंडाला योग्य आकार देऊन आकर्षक बांधणी करणारे सुभाष घोडके यांना लिखाणाचा छंद असल्याने सा.युवा मशाल,दै.जनमत व दै.संघर्ष या वर्तमानपत्रातून लिखानास सुरुवात केली.
त्यांचे जनता दलातील सहकारी शेख रब्बानी,नरोटे अप्पा,हंबीरे आबा यांच्या पुरोगामी विचारांशी घोडके यांची सांगड जुळल्याने त्यांच्या वर्तमान पत्रातून लिखानाची संधी मिळाली आणि त्या संधीचे सोने केले. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले प्रसार माध्यम आणि समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधूता,धर्मनिरपेक्षता ही विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधानिक मूल्य अंगीकारून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर स्वार होऊन सन २००१ ते २००३ – परिवर्तन शक्ती,सन २००४ ते २०१३ – साक्षी बहुजनांचे आश्रू पुसणारे, सन २०१४ ते २०१५ प्रबुद्ध साक्षी आणि डॉ.अशोक मोहेकर यांच्या सहकार्यातून सन २०१६ ते आज तागायत साक्षी पावन ज्योत या स्वतःच्या साप्ताहिक वर्तमानपत्रातून दलित- बहुजनांच्या न्याय हक्कासाठी, दबलेले-पिछलेले प्रश्न वेशीवर टांगून सर्वसामान्य जनास न्याय मिळवून देण्याचे कार्य प्रामाणिक आणि अखंडित अहोरात्र पोट तिडकीने सुरू आहे. धनदांडग्याच्या दबावास बळी न पडता किंवा कोणाच्याही लाचारीस भिक न घालता स्वाभिमानाने पत्रकारिता करत असताना कटू व गोड अनुभवाचे चटके सहन करत आजही पत्र्याच्या शेडमध्ये सुखी-समाधानी आहेत.
सुभाष घोडके यांनी केवळ पत्रकारिता आणि लेखन क्षेत्रातच नव्हे,तर पारंपारिक कलावंतांच्या पुनरुज्जीवनासाठीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था ही त्यांच्याच नेतृत्वाखाली उभी राहिलेली एक चळवळ आहे,जी पारंपारिक कलेला नवसंजीवनी देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न करत आहे.
पारंपारिक कलेचा वारसा असलेल्या अनेक कलाकारांना आधुनिक काळात प्रेक्षकांचा अभाव,आर्थिक स्थैर्याचा अभाव आणि नवीन पिढीत असलेली कला क्षेत्रातील उदासीनता यामुळे मोठी आव्हाने येत आहेत. अशा स्थितीत त्यांची कला हळूहळू लोप पावत चालली आहे.
सुभाष घोडके यांनी पारंपारिक कलेला जीवनदान देण्यासाठी प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली.या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कलावंतांना व्यासपीठ,आर्थिक पाठबळ आणि प्रेक्षक मिळवून देण्याचा निर्धार केला आहे.पारंपारिक नृत्य,गायन, वाद्य वादन,आणि अभिनय यांसारख्या कलांसाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातात.
नवोदित कलावंतांना मार्गदर्शन आणि संधी देऊन त्यांना कला क्षेत्रात प्रोत्साहन दिले जाते.
कलावंतांना त्यांच्या कलेसाठी आधुनिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.
सुभाष घोडके यांच्या संस्थेने ग्रामीण भागातील पारंपारिक कलावंतांना शहरांमध्ये मंच मिळवून दिला. त्यांच्या कलांचे प्रदर्शन विविध महोत्सव, नाट्यमंच आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये होत आहे, ज्यामुळे पारंपारिक कला जिवंत राहिली आहे.
सुभाष घोडके यांनी पारंपारिक कलेला बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यावर भर दिला आहे. यासाठी त्यांनी कलेच्या प्रदर्शनासाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग केला, ज्यामुळे प्रेक्षकवर्ग आणि कलावंत यांच्यातील अंतर कमी झाले.प्रबुद्ध रंगभूमी संस्थेच्या माध्यमातून घोडके यांनी पारंपारिक कलेला केवळ मनोरंजन म्हणून नव्हे, तर समाजप्रबोधनाचे माध्यम म्हणूनही विकसित केले आहे. सुभाष घोडके लिखित पथनाट्यामध्ये समाजातील प्रश्न,अन्याय,आणि बदलाची गरज यांचे प्रभावी चित्रण केले जाते.
सुभाष घोडके यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था पारंपारिक कलावंतांसाठी नवसंजीवनी ठरली आहे.त्यांनी केवळ कला जिवंत ठेवली नाही,तर समाजाला तिचे महत्त्वही पटवून दिले आहे.त्यांच्या या कार्यामुळे पारंपारिक कलेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार असून, कलाकारांना आपला स्वाभिमान टिकवून काम करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. - सुभाष घोडके यांना ६२ व्या वाढदिवसानिमित्त मंगलमय सदिच्छा
- — प्रा.राकेश रंजना सुभाष घोडके
बीएस्सी.बीएड
साक्षी कोचिंग क्लासेस,कळंब
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले